प्लॅस्टिकच्या बाटल्यांपासून तयार होतंय घर

75

सामना ऑनलाईन, पनामा

पनामामध्ये अशा गावाची निर्मिती होत आहे जेथे सारी घरे प्लॅस्टिकच्या बाटल्यांपासून बनवली आहेत. प्लॅस्टिकच्या बाटल्या पर्यावरणाला धोकादायक आहेत. या बाटल्या वापरल्यानंतर कचऱ्यात फेकून दिल्या जातात. या बाटल्या जाळल्या तर वायूप्रदूषण होते. पनामामध्ये ८३ एकर जागेवर हे प्लॅस्टिकचे गाव उभे राहत आहे. हा प्रोजेक्ट लवकरच पूर्ण होणार असून एक घर बनविण्यासाठी सुमारे १४ हजार बाटल्या वापरण्यात आल्या असून एकूण १२० घरे उभारण्यात येणार आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या