हळदुले सौंदर्य

17

सौंदर्य खुलवणारी ‘हळद’…तिचा वापर करून तुम्ही

काही घरगुतीही फेसपॅक तयार करू शकता. जे तुम्हाला नैसर्गिक सुंदरता प्रदान करतात. 

> चमचाभर हळदीमध्ये पाणी, दूध किंवा दही घालून ओलसर पेस्ट बनवा. ही पेस्ट चेहऱ्याला लावून गोलाकार मसाज करा. नंतर थंड पाण्याने चेहरा धुवा. यामुळे ब्लॅकहेड्स निघतात. त्वचा मऊ होते.

> एक चमचा मधात हळद आणि दूध घालून पेस्ट बनवा. ती १०-१५ मिनिटे चेहऱ्याला लावून ठेवा. पेस्ट सुकल्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवा. ही पेस्ट लावल्याने त्वचेचा पोत सुधारतो. सुरकुत्या कमी होतात.

> अंडय़ाच्या सफेद भागात चमचाभर हळद घाला. त्यामध्ये ऑलिव्ह ऑईल घालून पेस्ट बनवा. १५ मिनिटे चेहऱ्याला लावा. सुकल्यानंतर कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ करा. या पॅकमुळे त्वचा उजळून तिचा टोन सुधारेल. त्वचेत मॉइश्चर टिकून चेहऱ्याला चमक येईल.

> कोथिंबिरीच्या पाण्यात २ चमचे हळद घालून त्याची गुळगुळीत पेस्ट बनवा. रात्री झोपण्यापूर्वी चेहरा, नाक, हनुवटी आणि कपाळावर ही पेस्ट लावा. आठवण्यातून दोन वेळा हा फेसपॅक लावल्यास ब्लॅकहेड्सची समस्या कमी होईल.

> दोन चमचे डाळीच्या पिठात अर्धा चमचा हळद आणि १ चमचा लिंबाचा रस घालून तयार केलेली मऊसर पेस्ट १५ मिनिटे चेहऱ्याला लावा. सुकल्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवा. हा पॅक आठवडय़ातून दोनदा लावल्यास  त्वचा उजळते.

आपली प्रतिक्रिया द्या