कांदा कापताय, मग हे नक्की करा

38

सामना ऑनलाईन । मुंबई

पदार्थाची चव वाढवण्यासाठी स्वयंपाकात कांदा वापरला जातो. मात्र कांदा कापताना डोळ्यातून पाणी हे न चुकता येतंच. कांदा कापताना तुमच्या डोळ्यातून पाणी येऊ नये यासाठी हे उपाय नक्की करून पाहा-

– कांदयाचे दोन भाग करून पाण्यात टाका किंवा पाण्यातच कापा.
– कांदा कापण्याआधी तो थोडा वेळ म्हणजे १०-१५ मिनिट फ्रीज मध्ये ठेवा.
– कांदा कापताना जवळ मेणबत्ती किंवा लँप लावा.
– कांदा कापताना ब्रेडचा लहान तुकडा हळू हळू चावा.
– कांदा कापताना चॉपिंग बोर्ड वर थोडेसे व्हिनेगर लावा.
– कांदा कापताना धारदार सुरीचा वापर करा.
– कांदा कापताना सुरीवर थोडासा लिंबाचा रस लावा.

आपली प्रतिक्रिया द्या