टीप्स : कपाट स्वच्छ ठेवा!

435

कपाटात कपडे ठेवून ठेवून त्याला एक जुनाट वास यायला लागतो. काही कपडय़ांवर तर पांढरे डागही पडलेले दिसतात. मग ते कपडे चांगले असूनही वापरता येत नाहीत. पावसाळ्यात असे हमखास होतेच. पण कपाटात दुर्गंधी असेल तर ती घालवता येऊ शकते. त्यासाठी काय करायचे ते पाहूया

> ज्या कपाटात कपडे ठेवायचे आहेत ते आधी कोरडय़ा फडक्याने पुसून घ्या. त्यानंतर थोडय़ा पाण्यात कापूर घालून त्या पाण्याने कपाट आतून पुसून घ्यायला हवे. ते पूर्ण सुकल्यावरही त्यात कपडे ठेवा.

> किमती आणि महागडे कपडे प्लास्टीकच्या पिशवीत ठेवायचे. आता प्लॅस्टीक बंदी असल्यामुळे हे कपडे वृत्तपत्राच्या कागदामध्ये लपेटून ठेवले तरी चालेल. बाजारात खास प्रकारचे वॅक्स पेपरही मिळतात. त्यात कपडे ठेवल्यास ते थेट कपाटाच्या लाकडाच्या संपर्कात येण्यापासून वाचतात.

> कपडे बराच काळ कपाटात पडून राहिलेले असतील तर सहा-सात महिन्यांनी एकदा तरी ते बाहेर काढून थोडा वेळ उन्हात ठेवायचे. त्यानंतर ते प्लॅस्टीकच्या पिशवीत किंवा वर्तमानपत्राच्या कागदात ठेवाय

> आठवडय़ातून किमान एकदा कपाट उघडून काही वेळ उघडेच ठेवायचे. यामुळे हवा कपाटाच्या कोपऱ्या-कोपऱ्यात जाऊन कपाटात दुर्गंध राहणार नाही.

> तरीही कपाटात ठेवलेल्या कपडय़ांना जुनाट वास येत असेल तर कपडय़ांमध्ये नेप्थ्लीनच्या गोळ्या ठेवण्याचा प्रयोगही करून पाहा.

आपली प्रतिक्रिया द्या