तुमचा मोबाईल 5G आहे हे कसे ओळखाल ? सोपा मार्ग जाणून घेण्यासाठी वाचा सविस्तर बातमी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 1 ऑक्टोबर रोजी नवी दिल्ली येथे इंडिया मोबाइल काँग्रेसमध्ये हिंदुस्थानात 5G अधिकृतपणे लाँचिंग होत आहे. 5G घोषणेच्या वेळी पंतप्रधान मोदींसोबत रिलायन्सचे मुकेश अंबानी, एअरटेलचे सुनील मित्तल आणि Vi (पूर्वी व्होडाफोन आयडिया) चे Vi चे हिंदुस्थानचे प्रमुख रविंदर टक्कर हे उपस्थित होते. 5जी ची सेवा 13 प्रमुख शहरांमध्ये उपलब्ध होणार असून 2024 पर्यंत 5G संपूर्ण देशभरात उपलब्ध होईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

या सगळ्यामध्ये आता आमच्या फोनमध्ये 5G चालेल की नाही हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न सर्वांना पडला आहे. कारण, बहुतेक लोकांचे स्मार्टफोन हे 5G स्पेक्ट्रम लिलावापूर्वीचे आहेत. म्हणजेच, या स्मार्टफोन्सच्या निर्मितीच्या वेळी, भारतात 5G नेटवर्क कोणत्या ब्रँडवर उपलब्ध असेल हे निश्चित नव्हते. मात्र आता स्पेक्ट्रम लिलावानंतर अनेकांना हे जाणून घ्यायचे आहे की त्यांच्या फोनमध्ये 5G चालेल की नाही. तुमचा फोन 5G चालेल की नाही हे तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने शोधू शकता. यासाठी तुम्हाला फक्त काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.

सर्वप्रथम, तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनच्या Settings मध्ये जावे लागेल. येथे तुम्हाला अनेक पर्याय दिसतील. तुम्हाला Connection किंवा Wi-Fi & Network या पर्यायावर क्लिक करावे लागेल. याठिकाणी सिम आणि नेटवर्क किंवा काही फोनमध्ये मोबाइल नेटवर्कचा पर्याय मिळेल. त्यावर क्लिक करा. येथे तुम्हाला नेटवर्क मोडचा पर्याय मिळेल. याठिकाणी तुम्हाला 5G दिसत असेल, तर तुमचा फोन 5G ला सपोर्ट करू शकेल.

याशिवाय तुम्ही 5G नेटवर्क इतर मार्गांनी देखील शोधू शकता यासाठी तुम्हाला स्मार्टफोन ब्रँडच्या वेबसाइटवर जावे लागेल. येथे तुम्हाला तुमच्या फोनचे मॉडेल शोधावे लागेल. स्पेसिफिकेशन्सच्या यादीमध्ये तुम्हाला 5G ब्रँडबद्दल माहिती मिळेल. जर तुमचा फोन 5G ला सपोर्ट करत असेल आणि ते ब्रँड हिंदुस्थानात उपलब्ध असतील तर तुम्हाला 5G सेवा मिळेल. 5G सेवा देशभरात लागू झाल्यानंतर वर दिलेल्या मार्गाने गेलात तर तुम्हाला LTE Only, 2G Only, 3G Only, 3G/2G Only, LTE/3G/2G Only सोबतच 5G चाही पर्याय दिसेल. हा पर्याय ज्या मोबाईलमध्ये दिसेल तो फोन या सेवेसाठी सज्ज असेल.