आधारकार्ड घेऊन फिरायची गरज नाही, डाऊनलोड करा डिजिटल कॉपी

117

सामना ऑनलाईन । मुंबई

देशातील प्रत्येक नागरिकाकडे आजा आधारकार्ड आहे. सरकारनेही अनेक सरकारी कामांसाठीही आधारकार्ड सक्ती केली आहे. त्यामुळे आता आधारकार्ड गरज बनली आहे. मात्र प्रत्येकवेळी आधारकार्ड जवळ बाळगणे शक्य नाही. म्हणून आधारकार्डची डिजिटल कॉपी तुम्ही तुमच्याजवळ ठेऊ शकता. आधारकार्डची डिजिटल कॉपी डाऊनलोड करण्यासाठी आधार यूआयडी नंबर किंवा नोंदणी क्रमांकांची आवश्यकता आहे. ही डिजिटक कॉपी डाऊन करणेही अगदी सोपं आहे.

अशी डाऊनलोड करा आधारकार्डची डिजिटल कॉपी
१- UIDAI च्या वेबसाईटवर जाऊन e-Aadhaar पेजवर क्लिक करा.
२- त्यानंतर I have जवळील Aadhaar सिलेक्ट करा.
३- त्यानंतर तिथे आपला आधार क्रमांक लिहा. पूर्ण नाव आणि घरचा पिन कोड नंबरही लिहा.
४- Enter above Image Text बॉक्समध्ये वर दिलेले शब्द टाईप करा.
५- Get One Time Password वर क्लिक करा.
६- तुम्ही पॉप अप बॉक्सवरील कन्फर्मवर क्लिक केल्यावर नव टाईम पासवर्ड तुम्हाला मोबाईलवर येईल. तुम्ही तो वन टाईन पासवर्ड ईमेलवही मागवू शकता
७- त्यानंतर Enter OTPच्या जवळील बॉक्समध्ये पासवर्ड टाका

आपली प्रतिक्रिया द्या