उन्हाळ्यात उत्साह वाढवणारे ‘बेलफळा’चे सरबत घरी कसे बनवाल ?

बेलफळाला ‘अमृत फळ’ असे म्हणतात. उन्हाळ्यात शरीराला थंडावा देण्यासाठी इतर सरबतांबरोबरच बेलफळाचे सरबतही प्यावे. यामुळे पचनक्रिया सुधारते, रोगप्रतिकारशक्ती वाढते. शिवाय बद्धकोष्ठता, अपचनाच्या समस्याही दूर होतात.

बेलफळाचे सरबत प्यायल्याने पोट स्वच्छ राहते. पोटदुखी, मूळव्याध, पोटात गॅस होणे, उन्हाळ्यात होणारे पोटाचे आजार यासारख्या समस्यांवर आराम मिळतो.


View this post on Instagram

A post shared by Saamana (@saamanaonline)

बेलफळाचे सरबत अऩेक विकारांवर गुणकारी आहे. यामध्ये भरपूर प्रमाणात आयर्न, झिंक, बीटा-कैरोटिन, थायमिन, रायबोफ्लेविन आणि जीवनसत्त्व सी, जीवनसत्त्व ए आहे. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांत हे सरबत जरूर प्यावे. यामुळे शरीराला थंडावा मिळून लगेचच उत्साही वाटू लागते.

बेलफळात जीवनसत्त्व ए आणि सी असल्यामुळे डोळे आणि केसांकरिता ते गुणकारी आहे. यामुळे केस कोरडे होण्याचे प्रमाण कमी होते.

बेल अँण्टिडायबिटिक असल्यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहते. मधुमेह असलेल्यांनी बेलफळ खावे किंवा बेलफळाचे सरबत प्यावे. सरबतात शुगर फ्रीचा वापर करावा.

बेलफळामध्ये अँण्टीइंफ्लेमेटरी गुण आहेत. त्यामुळे किडनीचे विकार दूर व्हायला मदत होते. पोटाशी संबंधित इतर विकार असलेल्या रुग्णांकरिता बेलफळाचे सरबत लाभदायक आहे.

बेलफळाच्या रसामुळे श्वसनाच्या समस्या कमी होतात. बेलफळाचे सरबत पिण्याने घसा खवखवणे, सर्दी, खोकल्यात आराम मिळतो. म्हणून श्वसनाचे आजार दूर करण्यासाठी बेलफळाचे सरबत अवश्य प्या.

उन्हाळ्यात सतत होणाऱ्या उष्णतेच्या त्रासामुळे तुम्हाला थकल्यासारखे आणि निरूत्साही वाटत असते. अशा वेळी जर तुम्ही बेलफळाचे सरबत प्यायला तर तुम्हाला इन्संट ऊर्जा मिळू शकते. कारण एका शंबर मिलीग्रॅम बेल फळामध्ये 140 कॅलरिज असतात. बेलफळातील प्रोटिन्समुळेही तुम्हाला लगेच फ्रेश वाटू लागते.

बेलफळाचे सरबत कसे बनवाल ?

साहित्य: बेलफळातील गर 1 वाटी, 1 वाटी साखर, 1 लिंबू, 2 वेलदोडे, जिरे पावडर, मीठ (मधुमेहींनी साखरेचा वापर करू नये किंवा शुगर फ्रीचा वापर करावा.)

कृती : पिकलेली बेलफळे घ्यावीत. ती 3-4 तास पाण्यात भिजत घालावीत. त्यातील गर काढून कुस्करून घ्यावा. त्यात साखर, मीठ, वेलची पूड, लिंबू रस, जिरे पावडर घालून परत गाळावे. सरबत प्यायच्या वेळी पाणी व बर्फ घालावे. हे सरबत टिकत नाही ते लगेचच संपवावे लागते.

आपली प्रतिक्रिया द्या