रताळय़ाची कचोरी

66

साहित्य : १ मूठ चिरलेली कोथिंबीर, १ वाटी खवलेले खोबरे, ४-५ हिरव्या मिरच्या, ५० ग्रॅम बेदाणे, मीठ, साखर

आवरणासाठी साहित्य :  २५० ग्रॅम रताळी, १ मोठा बटाटा, चवीनुसार मीठ

कृती : प्रथम रताळी आणि बटाटे उकडून-सोलून घ्यावेत. नंतर हाताने कुस्करून पुरण यंत्रातून काढावेत. त्यात थोडे मीठ घालावे. १-२चमचे तुपावर मिरच्यांचे तुकडे परतवून घ्यावेत. त्यानंतर गॅसवरून खाली उतरवून त्यात इतर सर्व वस्तू घालून सारण करावे. रताळ्याची पारी करून त्यात थोडे सारण करून कचोऱ्या तयार कराव्यात. हव्या त्या वेळी वऱ्याच्या तांदळाच्या पिठात घोळवून तुपात तळाव्यात. गरमागरम सर्व्ह कराव्यात. उपवासाच्या वेळी छान लागतात.

आपली प्रतिक्रिया द्या