अरे वा! आता डेस्कटॉपवरून WhatsApp व्हॉइस आणि व्हिडीओ कॉलिंग करता येणार

बऱ्याच काळानंतर आता WhatsApp व्हॉइस आणि व्हिडीओ कॉलिंग फीचर डेस्कटॉपवरून देखील वापरता येणार आहे. सध्या हे फिचर केवळ Windows आणि iOS साठी डेडिकेटेड अॅपपर्यंत सीमित आहे. म्हणजे ब्राउझरद्वारे वापरण्यात येणाऱ्या व्हॉट्सअॅप वेबमध्ये सध्या या फिचरचा फायदा घेता येणार नाही.

हे फिचर केवळ वैयक्तिक कॉल्स पर्यंत मर्यादित आहे. तसेच यामध्ये अजून ग्रुप कॉलिंगचा पर्याय देण्यात आलेला नाही. या नव्या फिचरला अॅपद्वारे तपासण्याआधी लक्ष्य द्या की आपण Windows 10 64-bit व्हर्जन 1903 आणि त्यापेक्षा अपडेटेड किंवा macOS 10.13 आणि त्यापेक्षा अपडेटेड असणे आवश्यक आहे. तसेच ऑडिओ आउटपुट डिवाइस आणि मायक्रोफोन देखील अरेंज करणे आवश्यक आहे.

व्हॉट्सअॅपद्वारे डेस्कटॉपवर व्हॉइस आणि व्हिडीओ कॉलिंग असे कराल –

– सर्वात आधी ऑपरेटिंग सिस्टमच्या प्रमाणे व्हॉट्सअॅपचे लेटेस्ट व्हर्जन डाउनलोड आणि इंस्टॉल करा.

– त्यानंतर आपल्या डेस्कटॉपवर अॅप ओपन करा आणि स्मार्टफोनवर व्हॉट्सअॅप ओपन करून QR कोड स्कॅन करा.

– त्यानंतर बाद कोणत्याही चॅट विंडोवर जा. तिथे तुम्हाला टॉप राइट कॉर्नरमध्ये व्हॉइस आणि व्हिडीओ कॉलिंग आयकन दिसेल.

– व्हॉइस कॉल करण्यासाठी व्हॉइस कॉलचे बटन आणि व्हिडीओ कॉल करण्यासाठी व्हिडीओ कॉल बटनावर क्लिक करा.

डेस्कटॉपवर व्हॉइस-व्हिडीओ कॉल रिसीव्ह कसे करणार?

व्हॉट्सअॅपद्वारे कोणता कॉल आल्यास डेस्कटॉपवर एक पॉपअप विंडो दिसेल. कॉलला एक्सेप्ट करण्यासाठी रिसीव्ह बटनावर आणि डिक्लाइन करण्यासाठी डिस्कनेक्ट बटनावर क्लिक करा.

आपली प्रतिक्रिया द्या