टिप्स- तेल मालिश

सामना ऑनलाईन

बाळाला मसाज करायलाच हवा. पण तो सौम्य असेल तर बाळाला त्याचे फायदे मिळतात. बाळाचे पोषण होते, त्याची त्वचा मऊ होते. बाळाला गाढ झोप लागायलाही मदत होते. मात्र या हळुवार मसाजसाठी योग्य प्रकारचे तेल वापरले पाहिजे.

  • खोबरेल तेलाने बाळाला मालीश केली तर त्याची त्वचा मऊ आणि सौम्य तर होईलच, पण त्याबरोबरच हे तेल बाळाच्या त्वचेत मुरल्यामुळे त्वचेला थंडावा मिळेल. बदामाच्या तेलाने मसाज केल्यास त्याला छान झोप लागते.
  • बाळाची त्वचा मऊ होण्यासाठी त्याला मोहरीच्या तेलाने मसाज करायचा. यामुळे त्याची त्वचा मऊ होते. दुसरं म्हणजे मोहरीच्या तेलात लसणाच्या पाकळ्या घालून त्याने बाळाला मसाज केल्यास बाळाची पचनक्रिया वाढते.
  • लहान मुलांच्या पोटाशी संबंधित विकारांवर शेवंतीच्या तेलाने मसाज करणे चांगले ठरते. बाळाच्या संवेदनशील त्वचेसाठी हे तेल अतिशय उत्तम. अंघोळीआधी बाळाला एरंडेल तेलाने मालीश केली तर त्याचे नाजूक भाग मॉइश्चरायईज होतात. मात्र या तेलाने बाळाला मसाज करताना त्याच्या डोळे आणि ओठ सांभाळायचे.