अशी वाचवा वीज!

> आजकाल प्रत्येक घरात एसी असतोच. उन्हाळय़ात त्याचा जास्त वापर होतो, पण नेमक्या याच दिवसांत एसीची सर्व्हिसिंग करून घेतली पाहिजे. त्यातला फिल्टर बदलला पाहिजे. तो बदलला तर विजेचे बिल १५ ते २० टक्क्यांपर्यंत कमी करता येईल. एसीमधला फिल्टर बदलला तर एसीचा आवाजही कमी होईल.

> उन्हाळय़ातच घरातील बल्ब आणि टय़ुबलाईटच्या जागी एलईडी बल्ब लावा. एका ५ वॉट्सचा एलईडी बल्ब २० ते २५ वॉट्सच्या सीएफएल बल्बएवढा प्रकाश देतो. शिवाय त्यामुळे वीजही कमी खेचली जाते.

> साधारणपणे घरातील पाइपलाइन वारंवार लीकेज होते. त्यामुळे पाणी नाहक वाया जाते. उन्हाळय़ात तर पाण्याची खूपच गरज भासते. त्यामुळे उन्हाळय़ात पाइप लाइन चेक करून घेतली पाहिजे. त्यातून होणारे लीकेज लागलीच काढून टाकायला हवे.

> उन्हामुळे येणाऱ्या घामाला पर्याय नाही. या घामामुळे कपडे जास्त खराब होतात. मग ते धुण्यासाठी वॉशिंग मशीन वारंवार वापरणं ओघाने आलंच. पण उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच जर वॉशिंग मशीनचीही सर्व्हिसिंग करून घेतली तर त्याचं आयुष्य तर वाढेलच, पण विजेचे बिलही कमी येईल. आत्ताही सर्व्हिसिंग करून घेता येईल.

 

आपली प्रतिक्रिया द्या