निरामय नितळ…

137

>>श्रेया मनीष<<

चेहरा आपल्या सौंदर्याचा आरसा असतो. चेहऱ्यामुळेच आपल्या सौंदर्याला खरी ओळख मिळते. मोठे डोपे, टोकदार नाक, रसरशीत ओठ आणि त्वचेवर अजिबात मेद नसलेला चेहरा आपल्या सौंदर्याचं खरं दर्शन घडवतं. याला आपण फोटोजेनिक फेसही म्हणू शकतो कारण अशा चेहऱ्यांचे फोटो फारच सुंदर निघतात. मात्र दुसरीकडे आपल्या चेहऱ्यावर जर अधिक मेद असेल, डबलचिन, जॉ लाइन वाढलेली असेल तर नक्कीच आपला चेहरा वाईट, सुजलेला आणि वयापेक्षा मोठा वाटू लागतो अशा चेहऱ्याचे फोटोही सहसा चांगले येत नाहीत. फारच कमी मुलींना असा चेहरा शोभून दिसतो. चेहरा गुबगुबीत दिसण्याला आहाराचीही मोठी भूमिका असते. आपण जे खातो-पितो त्याचा आपल्या चेहऱ्यावरही प्रभाव पडतो. मग या जाणून घेऊया. खाण्या-पिण्याबरोबरच इतर काsणत्या कारणामुळे चेहरा गुबगुबीत व सुजलेला दिसू शकतो.

>चेहऱ्यावर दिसणारी सूज कमी करण्यासाठी बर्फाने चेहरा १० मिनिटे शेकवावा. यासाठी बाजारात मिळणारे फेस आइस पॅक तुम्ही वापरू शकता पिंवा बर्फाचा खडा संपूर्ण चेहऱयावर चोळू शकता पिंवा एका बाऊलमध्ये बर्फाचे ८-१० खडे टापून त्यामध्ये २ ग्लास पाणी टाका आणि २ जाडसर नॅपकिन त्यामध्ये भिजवा. अलगद पिळून चेहऱ्यावर ठेवा. नॅपकिन सामान्य झाल्यावर काढून बाऊलध्ये टाका आणि दुसरा नॅपकिन चेहऱयावर ठेवा. अशाप्रकारे आळीपाळीने १० मिनिटे चेहऱयावर थंड नॅपकिन ठेवा.

>आहारात अधिक मीठ व मीठयुक्त पदार्थ घेतल्याने चेहरा सुजू शकतो. खारे पदार्थ जसं ही वेफर, चिवडा, फरसाण, पापड, लोणचे इत्यादी खाल्ल्याने चेहरा सुजतो. तेलकट पदार्थ जसं काr पुऱया, भजी इत्यादी खाल्ल्याने चेहरा सुजतो.

>थायरॉइडची समस्या असल्यास त्यामुळेही चेहरा सुजतो. कमी झोपं मिळाल्यास अगर अधिक झोपल्यामुळे चेहरा गुबगुबीत व पफी दिसू लागतो. डीहायड्रेशनमुळे अर्थातच कमी पाणी प्यायल्यामुळे शरीरात पाण्याची कमी होऊन चेहरा पफी दिसू लागतो. मद्यपान करीत असाल तर यपृतावर विपरीत परिणाम होऊन चेहरा सुजू शकतो.

>एखादं औषध घेत असाल तर त्याचा साइट इफेक्ट म्हणूनही चेहरा सुजतो. या समस्यांपासून अशाप्रकारे सुटका मिळवू शकतो. सतत पंख्याखाली वा समोर बसल्यामुळेही चेहरा पफी दिसू लागतो.

>झोपतेवेळी डोक्याखाली उंच पिंवा दोन उशा घ्या. याने सकाळी उठल्यावर चेहरा पफी दिसत नाही. झोपतेवेळी कानात कापूस घालून झोपा. गरम होत नसेल तर शक्यतो डोक्यावर स्कार्फ बांधून झोपा. याने कानात वारा जाणार नाही आणि चेहरा पफी होणार नाही.

>औषधांच्या साइड इफेक्टमुळे चेहरा सुजत असेल तर डॉक्टरांच्या  सल्ल्याने औषधे बदलून घ्या. दिवसभरात भरपूर पाणी प्या. यामुळे शरीरातील सूज वाढविणारे टॉक्सिन्स लघवीवाटे बाहेर निघून जातील आणि चेहरा सुजणार नाही. ७-८ तासांची पुरेशी झोप घ्या.

आपली प्रतिक्रिया द्या