पावसाळ्यात होणाऱ्या आजारांना दूर कसे ठेवाल?

सामना ऑलनाईन। नवी दिल्ली

बदललेल्या हवामानामुळे पावसाळ्यात अनेक आजार डोके वर काढतात. यांची सुरूवात सर्दी -खोकल्यापासूनच सुरू होते. पण त्याचबरोबर अनेकांना पावसाळ्यात त्वचाविकाराचाही त्रास सुरू होतो. पण जर थोडी काळजी घेतली तर हे आजार सहज टाळता येण्यासारखे आहेत. यासाठी काही टीप्स.

तुम्ही पावसात कितीही भिजला असाल तरी घरी आल्यावर आंघोळ करायला विसरू नका. कारण त्यामुळे शरीर स्वच्छ होते. इन्फेशन होत नाही.

पावसाच्या पाण्यात अनेक विषाणू असतात. यामुळे केस खराब होतात. काही जणांचे केस तर पावसाच्या पाण्यामुळे गळतात. हे टाळायचे असेल तर केस शाम्पू व कंडिशनरने धुवावेत. आठवड्यातून एकदा केसांना तेल लावावे.

पावसाळ्यात हात पाय स्क्रबने घासावेत. त्वचा स्वच्छ होते. शक्य झाल्यास मेनिक्युअर, पेडिक्युअर करावे.

या दिवसात चेहऱ्यावर तेलकटपणा येतो. काही जणांना घाम येतो. यामुळे जवळ टिश्यू पेपर ठेवावा. त्याने त्वचा स्वच्छ करावी.

पावसाळ्यात हातापायांच्या नखांची विशेष स्वच्छता ठेवावी. नखे वाढवू नयेत. ती बारीक करावीत. पायाची नखं मोठी असली कि त्यात माती अडकते. ज्यामुळे त्वचा विकार होवू शकतात.

पावसाच्या पाण्यात विषाणू असतात त्यामुळे सॅनिटायझर जवळ ठेवावे. वेळोवेळी हात स्वच्छ करावे.

ओल्या पायाने थेट घरात न जाता आधी घराबाहेरच्या कार्पेटवर पाय स्वच्छ पुसावेत मग घरात प्रवेश करावा.

थंड पेय टाळावीत.

आपली प्रतिक्रिया द्या