रणरणत्या उन्हामुळेही पडू शकतात डोळे कोरडे, ही काळजी घेऊन राखा डोळ्यांची निगा

आजच्या काळात वाढते प्रदूषण, धूळ आणि सूर्यप्रकाश, संगणक किंवा लॅपटॉपवर सतत काम करणे, यामुळे डोळ्यांशी संबंधित समस्या अधिक लोकांमध्ये दिसून येत आहेत. ड्राय आय सिंड्रोम ही डोळ्यांशी संबंधित एक गंभीर समस्या आहे, या समस्येमध्ये तुमचे डोळे कोरडे होतात. कोरड्या डोळ्यामुळे तुम्हाला डोळ्यांशी संबंधित इतरही अनेक समस्या असू शकतात. उन्हाळ्यात डोळे कोरडे पडण्याची समस्या अधिक वाढते. दीर्घकाळ या समस्येला बळी पडल्याने तुमची दृष्टी कमी होऊ शकते आणि अनेक गंभीर समस्या उद्भवू शकतात. उन्हाळ्यात डोळे कोरडे पडण्याच्या समस्येपासून वाचवण्यासाठी डोळ्यांची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे.

डोळे कोरडे पडणे म्हणजे सोप्या भाषेत सांगायचे झाले तर डोळ्यातील अश्रू सुकतात. डोळ्यांमध्ये पुरेसा ओलावा नसल्यामुळे तुम्हाला डोळ्यांशी संबंधित अनेक गंभीर समस्या उद्भवू शकतात. यामुळे तुमच्या डोळ्यात खाज सुटणे, जळजळ होणे, लालसरपणा आणि वेदना होऊ शकतात.

1)एसीमध्ये डोळे कोरडे होतात.
उन्हाळ्यात डोळे कोरडे पडण्याची डोळ्याची समस्या उद्भवू नये म्हणून, आपण एअर कंडिशनिंगची काळजी घेणे आवश्यक आहे. डोळ्यांमध्ये खूप थंड हवा अचानक गेल्यास तुमच्या डोळ्यांवर गंभीर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे डोळ्यांतून पाणी येऊ लागते आणि नंतर डोळे कोरडे होऊ शकतात.

2) धूर आणि धूळ टाळा
उन्हाळ्यात धूर आणि धुळीमुळे डोळ्यांशी संबंधित अनेक गंभीर समस्या उद्भवू शकतात. यामुळे तुमचे डोळे कोरडे होऊ शकतात. ही समस्या टाळण्यासाठी बाहेर जाताना धूळ आणि धूर टाळण्यासाठी चष्मा अथवा गॉगल वापरावा.

3) स्विमिंग पूलमध्ये जाताना डोळे कव्हर करावेत
उन्हाळ्यात वाढत्या तापमानाचा कहर टाळण्यासाठी लोक स्विमिंग पूलवर जातात. स्विमिंग पूलमध्ये पोहण्यापूर्वी डोळे झाकून घ्यावेत. यामुळे तुमच्या डोळ्यातील पाणी, घाण कमी होईल आणि संसर्गाचा धोका कमी होईल.

4) आय ड्रॉप्सचा वापर करा
डोळे कोरडे होण्याच्या समस्येमध्ये डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतर आय ड्रॉप्स वापरावेत. उन्हाळ्यात डोळे कोरडे पडण्याची समस्या टाळण्यासाठी आय ड्रॉप्सचा वापर खूप फायदेशीर आहे.

5) शरीर हायड्रेटेड ठेवावे
उन्हाळ्यात शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे तुम्हाला अनेक गंभीर समस्यांचा धोका असतो. यामुळे तुम्हाला डोळे कोरडे होण्याची समस्या देखील होऊ शकते. त्यामुळे डोळ्यांचे नुकसान होण्यापासून वाचवण्यासाठी दिवसभरात पुरेशा प्रमाणात पाणी पिणे आवश्यक आहे.

परीक्षेदरम्यान डोळे निरोगी ठेवण्यासाठी आणि डोळ्यांची काळजी घेण्यासाठी फॉलो करा ‘या’ खास टिप्स

 विद्यार्थी सध्या वेगवेगळ्या परीक्षा देत आहेत, तसेच परीक्षांसाठी जोरदार तयारी करत आहेत. डिजिटल उपकरणं दीर्घ काळ वापरणं, पुस्तकं वाचणं, वाचन आणि परीक्षेचे दडपण यामुळे शरीराच्या अत्यंत महत्त्वाच्या आणि सहसा विचारात घेतल्या न जाणाऱ्या ‘डोळे’ या अवयवाला प्रचंड थकवा येतो.

डोळे निरोगी ठेवण्यासाठी ‘हे’ उपाय नेहमी करणे आवश्यक
१) जास्त वेळ कॉम्प्युटर वापरल्याने अनेकदा डोळ्यांना थकवा जाणवतो. डोळे कमी वेळा उघड-बंद न केल्यास डोळ्यांतले ल्युब्रिकेशन कमी होते आणि त्यामुळे डोळे अधिक थकलेले, कोरडे होतात.
उपाय- वाचन करताना डोळ्यांपासून किमान 25 सेमीचे अंतर राखणं गरजेचं आहे. अनेक तास वाचन करत असताना मध्ये पुरेशी विश्रांती घ्यावी. 5 मीटर अंतरावर असलेल्या लांबच्या वस्तूंवर नजर टाकल्यासही डोळ्यांना आराम मिळू शकतो.

2. पुरेशी झोप न झाल्यानं डोळे कोरडे होतात, यामुळेही डोळ्यांची जळजळ होते. संसर्ग होण्याचे व अस्वस्थपणा येण्याचे हे आढळणारे कारण आहे.
उपाय- डोळे ताजेतवाने ठेवण्यासाठी डोळे चोळणे टाळा. डोळ्यांवर गार पाणी मारल्यास डोळे ताजे राहतात व ओलावा टिकून राहतो. कृत्रिम अश्रू किंवा आयड्रॉप किंवा ल्युब्रिकेशन यासारखे पर्याय वापरल्यास डोळ्यांतला नैसर्गिक ओलावा कायम राहण्यासाठी मदत होते.

3- काँटॅक्ट लेन्स वापरल्याने झोप अपुरी होणे, हा सर्रास आढळणारा आणखी एक प्रश्न आहे. अनेक तास काँटॅक्स लेन्स घालून ठेवल्यास डोळ्यांसाठी घातक ठरू शकते. यामुळेही डोळ्यांना होणारा ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतो.
उपाय- अशा स्थितीमध्ये, चष्मा वापरावा आणि लेन्स आणि चष्मा असा दोन्हीचा आळीपाळीने वापर करावा. विद्यार्थ्यांनी सिलिकॉन हायड्रोजनपासून बनवलेल्या चांगल्या गुणवत्तेच्या काँटॅक्ट लेन्सचा वापर करावा. ऑक्सिजन खेळता राहण्याची प्रक्रिया सुधारित असणारे हे नवे साहित्य आहे. यामुळे अस्वस्थ वाटण्याचे प्रमाण बरेच कमी होते. आकडेवारीनुसार, अपुरी झोप झाल्याने किंवा भरपूर अभ्यास केल्यानं परीक्षा सुरू होण्याच्या अगोदर 5-10% शालेय विद्यार्थ्यांच्या डोळ्यांवर ताण येतो किंवा डोळ्यांना थकवा जाणवतो.

काही खास टिप्स

1. तुम्हाला चष्मा असेल तर अभ्यास करत असताना नेहमी चष्मा वापरायला हवा.

2. तुम्ही काँटॅक्ट लेन्स वापरत असाल तर दररोज 10-12 तासांपेक्षा जास्त वेळ लेन्स घालू नका.

3. टीव्ही बघणे किंवा मोबाइल गेम खेळणे टाळा.

4. 20-20-20 या नियमाचा सराव करा. 20 मिनिटं वाचन केल्यानंतर डोळे 20 सेकंद बंद करा आणि त्यानंतर 20 फूट इतक्या अंतरावर पाहा. यामुळे डोळ्यांवरचा ताण बराच कमी होईल.

5. ल्युब्रिकंट आयड्रॉप नेहमी किंवा गरजेनुसार वापरा.

साधारणपणे घ्यायची काळजी आणि बाळगायची सावधगिरी:
अभ्यास करत असताना योग्य स्थितीमध्ये बसा. कधीही पाठीवर झोपून वाचन करू नका.
डोळे आणि स्क्रीनची खालची बाजू यांच्यामध्ये 45 अंशाचा कोन असणे, ही आदर्श स्थिती आहे.
कॉम्प्युटर टर्मिनलसारख्या परावर्तित करणाऱ्या पृष्ठभागांवर काम करत असताना, ग्लेअर व डोळ्यावरील ताण कमी करण्यासाठी अँटि-रिफ्लेक्शन कोटेड ग्लासेसचा वापर करा.
मंद प्रकाशयोजना असलेल्या ठिकाणी वाचन करणे कटाक्षाने टाळावे, अन्यथा डोळ्यांवर आणखी ताण येतो. चालती बस, ट्रेन किंवा कार यामध्येही वाचन करणे टाळावे.
परीक्षेदरम्यान वेळापत्रक बदलत असल्याने त्यानुसार आहारामध्ये चांगले बदल करणे महत्त्वाचे आहे. गाजर, पपई, पालक अशा भाज्यांचे व फळांचे सेवन अधिक करायला हवे. या अन्नामध्ये बिटा-कॅरोटिनचे प्रमाण अधिक असते आणि ते दृष्टी निरोगी राहण्यासाठी महत्त्वाचे असते.
डोळ्यांचे आरोग्य चांगले राखण्यासाठी पुरेशी झोप गरजेची आहे.
डोळ्यांची नियमित तपासणी
डोळ्यांना काहीही त्रास होत नसला तरी वर्षातून एकदा ऑप्टोमेट्रिस्ट किंवा ऑफ्थॅल्मॉलॉजिस्टकडे जाऊन डोळ्यांची तपासणी करून घ्या.