टक्कल पडतंय? आता चिंता विसरा, लसूण ठरतोय रामबाण उपाय

12277

महिला असो किंवा पुरुष प्रत्येक जण आपल्या केसांची निगा राखण्यासाठी खटपट करत असतो. केसांवरही तुमचे सौंदर्य अवलंबून असते. मात्र प्रदूषण, खराब वातावरण, रसायन युक्त आहार, दूषित पाणी, मानसिक चिंता, याचा परिणाम होऊन कमी वयातच केस गळण्यासारखे प्रकार वाढलेले पाहायला मिळतात. यावर एक घरगुती रामबाण औषध आहे आणि ते म्हणजे लसूण.

आपल्या देशात जेवताना लसणाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. विशेष म्हणजे हा लसूण केस सूती, लांब आणि दाट ठेवण्यासाठी उपयुक्त ठरतो. लसूण जेवढा शरीरासाठी उपयोगी आहे, तितकाच तो केसांसाठी देखील उपयोगी आहे.

1. लसूण हा व्हिटॅमिन बी – 6, सी, मँगनीज अशा पोषक तत्त्वांनी भरलेला असतो. ज्यामुळे केस गळती थांबते.
2. लसूण शॅम्पू किंवा तेलात टाकून त्याचा वापर केल्यास केसांची वाढ होते, केस दाट होतात.
3. लसूण असलेले तेल टाळूवर लावले असता रक्ताभिसरण चांगले होते. केसांची मुळं अधिक घट्ट होतात, आणि केसांची वाढ होण्यास मदत होते.

(लसूण कसा वापरावा हे वाचण्यासाठी पुढे स्क्रोल करा)

Lockdown treatment –अंडरआर्म काळे पडलेत ? मग त्वचा उजळवण्यासाठी हे उपाय करून पाहा

लसूण वेगवेगळ्या प्रकारे वापरता येतो

लसणाच्या 8 पाकळ्या घ्या, 1 मध्यम आकाराचा कांदा घ्या. कढई मध्ये अर्धा कप ऑलिव्ह ऑईल घ्या, अर्धा कप खोबऱ्याचे तेल घ्या, गरम करा. त्यामध्ये लसूण कांदा यांची पेस्ट टाका, मिश्रण एकजीव करून घ्या. लालसर रंग आल्यानंतर तेल काढून थंड होऊ द्या. नंतर दोन चमचे तेल डोक्यावर लावून मालिश करा. आठवड्यात 3 वेळा असे केल्यास हळूहळू केस दाट आणि सूती होतील.

मध आणि लसूण मिश्रण

मध हे केसांना सूती ठेवण्यास मदत करते. लसणाचा 8 पाकळ्या आणि मध एकत्र करा. हे मिश्रण केसांना लावून 20 मिनिटे तसेच ठेवा. त्यानंतर केस शॅम्पूने धुवून काढा.

हे घरगुती उपाय असलेतरी आयुर्वेदिक डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच त्याचा वापर करणे अधिक योग्य ठरेल.

आपली प्रतिक्रिया द्या