समलेश्वरी एक्सप्रेसचे डब्बे रुळावरून घसरले, तिघांचा मृत्यू

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

ओदिशामध्ये हावड़ा-जगदलपुर समलेश्वरी एक्सप्रेसचे डब्बे रुळावरून घसरल्याने तिघांचा मृत्यू झाला. ही दुर्घटना सिंगापूर रोड आणि केतुगुडा दरम्यान घडली. तिन्ही मृत व्यक्ती रेल्वे कर्मचारी असून ड्यूटीवर तैनात असताना हा अपघात झाला. या प्रकरणी स्टेशन मास्तरला निलंबित करण्यात आले आहे.

एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, सिंगापूरहून केतुगुडाकडे जाताना समलेश्वरी एक्सप्रेसचा जनरल डब्बा रुळावरून घसरला आणि स्टेशनवरील एका टॉवर कारला घडकला. यानंतर इंजिनमध्ये आग लागली आणि आणखी दोन डब्बे रुळावरून घसरले. यात रेल्वेचे तीन कर्मचारी मृत्यू पावले. रायगडा स्टेशनजवळ हा अपघात झाला. अपघातावेळी एक्सप्रेसमध्ये 148 प्रवासी होते. अपघातानंतर त्यांना बसद्वारे रायगडा स्टेशनवर पोहोचवण्यात आले.

दरम्यान, अपघाताप्रकरणी रेल्वेने सेफ्टी कमिन्शन यांना तपासाचे आदेश दिले आहे.