पैशांची बचत करणारा आणि खिशाला परवडणारा मस्त प्रिंटर

एचपीचा स्मार्ट टँक 580 प्रिंटर बाजारात आला आहे. प्रिंटरमध्ये सगळ्यात जास्त कटकट असते ती शाई किंवा कार्ट्रीज बदलण्याची. या प्रिंटरमध्ये कटकटीशिवाय शाई बदलणं शक्य होतं. प्रिंटर विकत घेताना त्याची किंमत किती आहे हे पाहून ग्राहक पुढचा निर्णय घेत असतो. हा प्रिंटर परवडणाऱ्या दरात उपलब्ध असल्याने तो ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहे. आम्ही या प्रिंटरची चाचणी घेऊन त्याची गुणवत्ता तपासली असता हा प्रिंटर खरोखर पसंतीस उतरणारा ठरला. प्रिंटरमधून 12 हजार ब्लँक अँड व्हाईट प्रिंट निघतात तर 6 हजार कलर प्रिंट निघतात. गुणवत्ता, किंमत, प्रिंटचा दर्जा आणि इतर बाबी लक्षात घेता या आम्ही प्रिंटरला 5 पैकी 4 स्टार देण्याचं ठरवलं आहे. हा प्रिंटर लहान उद्योगांसाठी अत्यंत उपयुक्त असून तो घरासाठी, कार्यालयातील वापरासाठीही चांगला आहे. या प्रिंटरची किंमत अंदाजे 18848/- इतकी आहे.