ऋतिक रोशनची एक्स वाईफ आणि कुटुंबासोबत फ्रान्समध्ये मस्ती

1486

बॉलिवूडचा हॅन्डसम हंक अभिनेता ऋतिक रोशन आणि सुजान खान यांनी घटस्फोट घेतला असला तरीही दोघांमध्ये मैत्री मात्र कायम आहे. नवीन वर्षाच्चा निमित्ताने ऋतिक रोशन आणि सुजानसह दोन्ही कुटुंब एकत्र आले. विदेशात दोन्ही कुटुंबांनी नवीन वर्षाची सुट्टी एन्जॉय केली. याचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये दोन्ही कुटुंब रेस्टॉरन्टमध्ये सहभोजन घेताना दिसताहेत.

इंटरनेटवर व्हायरल झालेल्या या फोटोमध्ये सर्व सदस्य हातामध्ये ग्लास घेऊन आणि चिअर्सची पोज देत आहेत. दोन्ही कुटुंब एकत्र आल्याने सर्वांच्या चेहऱ्यावरील आनंद खूप काही बोलून जात आहे. दरम्यान, हा फोटो फ्रान्समधील एका रेस्टॉरंटमधील असल्याचीही माहिती मिळत आहे. सुजानने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा फोटो शेअर केला आहे.

hrithik-roshan-sujan-khan

ऋतिक आणि सुजान वेगळे झाले असले तरीही मुंबईतही अनेकदा एकत्र दिसले आहेत. ऋतिक वादामध्ये सापडल्यानंतर सुजान त्याचा बचाव करतानाही दिसली. तसेच त्याच्या चित्रपटांचे प्रमोशनही ती करते.

आपली प्रतिक्रिया द्या