ह्रितिक रोशन बनला सर्वाधिक कर भरणारा अभिनेता

41

सामना ऑनलाईन। मुंबई

ह्रितिक रोशन हा या वर्षी सर्वाधिक कर भरणारा अभिनेता बनला आहे. त्याने २०१५-२०१६ सालासाठी तिसऱ्या तिमाहीमध्ये ८० कोटी रूपयांचा कर भरला आहे. गेल्या वर्षी त्याने ५० कोटींचा कर जमा केला होता. मोहंजोदारो ह्रितीकचा सिनेमा फारसा चालला नाही. समीक्षकांनीही या चित्रपटाबाबत नाराजी व्यक्त केली होती. असं असलं तरी या चित्रपटाने जगभरात १०० कोटींचा गल्ला जमावला होता. मात्र ह्रितिक रोशनला या चित्रपटामुळे बराच आर्थिक फायदा झाला हे त्याने भरलेल्या करावरून स्पष्ट होतंय.

aamir

कर भरणा करणाऱ्या अभिनेत्यांमध्ये आमीर खान दुसऱ्या क्रमांकावर आहे त्याने या तिसऱ्या तिमाहीमध्ये ७२ कोटी रूपयांचा कर भरला आहे.

ranbir

तिसऱ्या नंबरवर रणबीर कपूर असून त्याने ३७ कोटींचा आगाऊ कर भरला आहे. २०१५मध्ये त्याने ९ कोटींचा कर भरला होता.

salman-khan

आगाऊ कर भरण्याच्या या यादीमध्ये सलमान खान चौथ्या क्रमांकावर आहे. त्याने तिसऱ्या तिमाहीसाठी १४ कोटींचा कर जमा केला आहे. अभिनेत्रींमध्ये दीपिका पदुकोणने गेल्या वर्षी ३.२ कोटींचा कर भरला होता तर तिसऱ्या तिमाहीत तिने ३ कोटींचा कर भरला आहे. करीना कपूरने ७० लाखांचा आगाऊ कर भरला आहे. दिग्दर्शकांबाबत बोलायचं झालं तर करण जोहरने १५ डिसेंबरपर्यंत ४.२ कोटींचा कर भरलाय तर संजय लीला भंसाली यांनी ३० लाख रूपयांचा करभरणा केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या