कोकण बोर्ड राज्यात पुन्हा अव्वल; निकाल 95.89 टक्के

623

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बारावी परीक्षेचा निकाल गुरुवारी जाहीर झाला़. राज्यात पुन्हा एकदा कोकण बोर्ड अव्वल ठरले आहे. कोकण बोर्डाचा निकाल 95.89 टक्के लागला. कोकण बोर्डातून 30,143 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी 28,903 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातून एकूण 19,609 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी 18,728 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. रत्नागिरी जिल्ह्याचा निकाल 95.52 टक्के लागला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून 10,536 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी 10,175 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून सिंधुदुर्ग जिल्ह्याचा निकाल 96.57 टक्के लागला आहे.

निकालात मुलींची बाजी
कोकण बोर्डामध्ये 14,810 मुली परीक्षेला बसल्या होत्या. त्यापैकी 14,404 मुली उत्तीर्ण झाल्या. मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 97.20 टक्के आहे. मुलांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 92.40 टक्के आहे. कोकण बोर्डात 15,988 मुले परीक्षेला बसली होती. त्यापैकी 14,773 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील निकालातही मुलींनी बाजी मारली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात 9,669 मुली परीक्षेला बसल्या होत्या. त्यापैकी 9,383 मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. मुलींची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी 97.04 टक्के आहे. मुलांची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी 91.70 टक्के आहे. 10,104 मुले परीक्षेला बसली होती. त्यापैकी 9,542 मुले उत्तीर्ण झाली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुलींचा निकाल 97.69 टक्के लागला आहे. 5,1441 मुली परीक्षेला बसल्या होत्या. त्यापैकी 5,021 मुली उत्तीर्ण झाल्या. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुलांचा निकाल 93.71 टक्के लागला आहे. 5,582 मुले परीक्षेला बसली होती. त्यापैकी 5,131 मुले उत्तीर्ण झाली.

निकालात 2.66 टक्क्यांनी वाढ
कोकण बोर्डाचा गतवर्षी बारावीचा निकाल 93.23 टक्के लागला होता. यंदा हा निकाल 2.66 टक्क्यांनी वाढला असून निकालाची टक्केवारी 95.89 टक्के आहे. कोकण बोर्डाने यंदाही आपले राज्यात अव्वल स्थान कायम ठेवले आहे. कोकण बोर्डात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात बारावीच्या परीक्षेत कॉपीचे एकही प्रकरण घडले नाही. यंदा गैरप्रकारांना आळा घालण्यात कोकण बोर्डाला यश आले आहे.

शाखानिहाय निकाल

शाखा                         टक्के

विज्ञान                      98.57 टक्के

कला                       90.08 टक्के

वाणिज्य                   97.89 टक्के

व्यावसायिक विषय       95.29 टक्के

आपली प्रतिक्रिया द्या