ठाण्याच्या टेंभी नाक्यावर प्रचंड जल्लोष

ठाण्याच्या टेंभी नाक्यावर शिवसैनिकांनी प्रचंड जल्लोष केला. शिवसैनिक व पदाधिकारी हातात भगवा झेंडा घेऊन टेंभी नाक्यावर दाखल झाले.  शिवसेना झिंदाबादच्या गगनभेदी घोषणांनी ठाणे शहर दुमदुमून गेले. आनंदाश्रम येथे दिवंगत जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांना शिवसैनिकांनी अभिवादन केले. यावेळी शिवसैनिकांनी  पेढे वाटून आपला आनंद व्यक्त केला. ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे, उपजिल्हाप्रमुख सुनील पाटील, शहरप्रमुख प्रदीप शिंदे,  शिवसेनेचे प्रवक्ते चिंतामणी कारखानीस, विभागप्रमुख प्रकाश पायरे, कृष्णकांत कोळी, महिला आघाडी संघटक समीधा मोहिते, युवासेनेचे किरण जाधव, विजय साळुंखे, युवती सेनेच्या धनश्री विचारे आदी उपस्थित होते.

खालापूर, महाड, मुरुडमध्ये फटाक्यांची आतषबाजी

मुरुडमधील बाजारपेठेत फटाक्यांची आतषबाजी करीत शिवसैनिकांनी   आनंदोत्सव साजरा केला. यावेळी उपतालुकाप्रमुख अशिलकुमार ठाकूर, आदेश दांडेकर, प्रशांत कासेकर, कुणाल सतविडकर, प्रमोद उमरोटकरअविनाश दाडेकर, राकेश मुळेकर, गोंजी कासार, सुनील शेळके, सिद्धु बाथम आदी उपस्थित होते. महाड, खालापूर, रसायनी, खोपोली, शिळफाटा येथेही न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करण्यात आले. यावेळी सहसंपर्कप्रमुख भाई शिंदे, तालुकाप्रमुख एकनाथ पिंगळे, उपशहरप्रमुख अनिल सानप, दिलीप पुरी, विवेक पाटील यांच्यासह असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.

कल्याणमध्ये शिवसैनिकांनी साखर वाटली

कल्याणच्या शिवाजी चौकातील मुख्य शाखेत शिवसैनिकांनी कोर्टाचा निकाल येताच साखर वाटून सर्वांचे तोंड गोड केले. शिवसेनेच्या दसरा मेळाव्यास मोठय़ा संख्येने उपस्थित राहण्याचा निर्धारही सर्वांनी केला. यावेळी शहरप्रमुख सचिन बासरे, वंडार कारभारी, सुधीर बासरे, रवी कपोते, अनिल डेरे उपस्थित होते. कल्याण पूर्वेतही शहरप्रमुख शरद पाटील, माजी महापौर रमेश जाधव आदींनी जल्लोष केला.

शिवतीर्थावर दसरा मेळाव्याला परवानगी मिळाल्यानंतर विभाग क्रमांक 2 च्या वतीने फटाके फोडून, पेढे वाटून आनंद साजरा केला. यावेळी विभागप्रमुख सुधाकर सुर्वे, महिला विभाग संघटक मनाली चौकीदार, विधानसभा संघटक संतोष राणे, नंदू मोरे, संतोष धनावडे, उपविभागप्रमुख राजन निकम, उदय रुघाणी, राजू खान, रवींद्र वेदपाठक, शंकर हुंडारे, प्रवीण ठाकूर, प्रकाश माघाळकर, अॅथोनी पॉल, उपविभाग संघटक आकांक्षा नागम, सुवर्णा प्रसादे, उपविभाग समन्वयक कृष्णा मुळीक यांच्यासह शेकडो शिवसैनिक उपस्थित होते.

कणकवलीत शिवसैनिकांनी फटाके लावून जल्लोष साजरा केला. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजू शेटये, तालुकाप्रमुख प्रथमेश सावंत, नगरसेवक कन्हैया पारकर, अड. हर्षद गावडे, रामू विखाळे, महेश कोदे, रूपेश आमडोसकर उपस्थित होते.

दक्षिण मुंबई विभाग क्रमांक 12 च्यावतीने चिराबाजार येथे शिवसैनिकांनी मोठा जल्लोष केला. फटाके लावून, पेढे वाटून आनंद साजरा केला. यावेळी विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ, उपनेत्या मीना कांबळी यांच्यासह शिवसेना-युवासेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.