हा डास आहे की डासांमधला डायनासोर,शास्त्रज्ञही चक्रावले

55

सामना ऑनलाईन । बीजिंग

‘मच्छर’ (डास) हा शब्द जरी कानावर पडला तरी नाना पाटेकर यांच्या यशवंत सिनेमातील ‘एक मच्छर…’ हे गाणं आठवतं. पण चीन मधील ‘एक मच्छर’ चर्चेचा विषय ठरला आहे. चीनमध्ये आढळलेला एक डास हा इतर डासांच्या तुलनेत इतका महाकाय आहे की हा डास आहे की डासांमधला डायनासोर अशी चर्चा सध्या रंगली आहे.

चीनमधील सिचुआन प्रांतात एका संशोधनादरम्यान हा डास शास्त्रज्ञांना सापडला आहे. होलोरुसिया मिकादो या प्रजातीचा डास पहिल्यांदाच जपानमध्ये सापडला होता. या डासाचा आकार ११.१५ सेंटीमीटर आहे. त्याचे पंख आठ सेंटीमीटर एवढे होते. चीनी शास्त्रज्ञांना चेंग्दू येथील माऊंट किंगचेंग यात्रेत हा डास सापडला होता. पण विशेष म्हणजे हा महाकाय डास रक्तपिपासू नसून तो शाकाहारी आहे. तो फुलांमधील रस पितो. या प्रजातीतील वयस्क डासांचे आयुष्यमानही कमी असते. जगभरात डासांच्या अनेक प्रजाती असून त्यातील १०० प्रजाती या रक्तपिपासू आहेत.पण होलोरुसिया मिकादो या महाकाय प्रजातीचा डास मात्र यास अपवाद आहे.

आपली प्रतिक्रिया द्या