भयंकर! जपानच्या या हॉटेलमध्ये मिळतंय मानवी मांस

170

सामना ऑनलाईन । टोकियो

कुठल्याही हॉटेलची लोकप्रियता ही तिथल्या मेन्यूवर अवलंबून असते. यामुळे हॉटेलच्या नावापेक्षा तिथे मिळणाऱ्या खाद्यपदार्थांच्या नावानेच ते हॉटेल ओळखलं जातं. पण सध्या सोशल साईटवर टोकियोत नव्यानेच सुरू झालेल्या इडीबल ब्रदर (“Edible Brother”) या महागड्या हॉटेलची चर्चा आहे. कारण या हॉटेलमध्ये चिकन, मटन नाही तर चक्क मानवी मांसापासून तयार करण्यात आलेल्या वेगवेगळ्या डिशेस बनवल्या जातात. विशेष म्हणजे हे अमानवीय हॉटेल सुरू करण्यासाठी इथल्या सरकारने हॉटेलमालकाला कायदेशीर परवानगीही दिली आहे. मानवी मांस विकणारे हे जगातले पहिलं हॉटेल आहे.

जपानी भाषेत या हॉटेलचे नाव “The Resoto ototo no shoku ryohin” असे ठेवण्यात आले आहे. याचा इंग्रजीत अर्थ इडीबल ब्रदर (“Edible Brother”) असा आहे. जपानी नागरिकांबरोबरच जगातील सर्व नागरिकांना या हॉटेलमध्ये प्रवेशास परवानगी आहे. मानवी मांसापासून तयार केलेल्या डिशेसची किंमत १०० ते १००० युरो पर्यंत आहे. इथल्या सगळ्यात महागड्या डिशची किंमत ११९३ अमेरिकन डॉलर्स आहे. या हॉटेलमध्ये मानवी मांस खाण्यासाठी आलेला पहिला पर्यटक अर्जेटीनाचा असून मानवी मांस व पोर्क यांची चव जवळजवळ सारखीच असल्याचं त्यानं सांगितलं आहे. हॉटेलवाले एका विशिष्ट मसाल्यात या डिशेस बनवत असल्याने आपण मानवी मांस खातोय असं वाटतच नाही असंही तो म्हणाला आहे.

२०१४ साली जपान सरकारने मानवी मांसाचा अन्नघटक म्हणून वापर होऊ शकतो यावर शिक्कामोर्तब केले होते. पण त्यासाठी काही अटी घालण्यात आल्या. मृत व्यक्तीचे शरीर जंतूविरहीत केल्यानंतरच त्याचा अन्नात उपयोग करण्यात यावा अशी अट यात ठेवण्यात आली होती. जगातील ९९ टक्के लोकांना हा निर्णय ऐकूण धक्का बसला. पण तरीही हे हॉटेल सुरू करण्यात आलं आहे.

ज्यांना आपले शरीर या हॉटेलला विकायचे असते त्यांना जिवंतपणीच या हॉटेलमालकासोबत एक कायदेशीर करार करावा लागतो. त्यानुसार त्याचं मृत शरीर विकत घेण्यासाठी हॉटेलमालक त्यांच्या कुटुंबाला ३० हजार युरो किंवा ३५,७९९ डॉलर्स देतो. त्यानंतर मृत शरीर हॉटेलकडे सुपूर्द केलं जातं. नंतर रासायनिक प्रक्रिया करुन त्याचा अन्न म्हणून वापर करण्यात येतो.

आपली प्रतिक्रिया द्या