झांबियाच्या आकाशात दिसली मानवी आकृती, भुताखेतांच्या चर्चेला ऊत

सामना ऑनलाईन। झांबिया

झांबियातील किटवे येथे मुकुबा मॉलवर ढगात तरंगणारी काळ्या रंगाची मानवी आकृती दिसल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. तब्बल ३३० फूट लांब असलेली ही आकृती अर्धातास हवेत तरंगत होती. हा भुताटकीचा प्रकार असल्याचे काहीजणांचे म्हणणे आहे तर आकाशात मानवी आकृती दिसणे हा दैवी चमत्कार असल्याचे काही जणांचे मत आहे. या आकृतीचा व्हिडिओ सोशल साईटवर व्हायरल झाला असून तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

रविवारी संध्याकाळी किटवे येथील मुकुबा मॉलबाहेर नेहमीप्रमाणेच लोकांची गर्दी ऊसळली होती.त्याचवेळी मॉलवरील ढगात तरंगणाऱ्या एका काळ्या रंगाच्या मानवी आकृतीने सगळ्यांचे लक्ष वेधले. १०० मीटर लांब आणि ३३० फूट उंच असलेली ही मानवी आकृती मॉलच्याच दिशेने बघत असल्याचे पाहून काहीजणांनी भूत भूत असे बोंबलत धूम ठोकली. तर काहीजण भीतीने गारठून गेले. आकाशात तरंगणाऱी ही आकृती बघून अनेकांनी गाड्या रस्त्यातच थांबवल्या. तर काही जणांनी ही गूढ आकृती टिपण्यासाठी धडाधड आपले मोबाईल कॅमरे सेट केले.

जेव्हा जमिनीवर लोकांची ही धावपळ सुरु होती. तेव्हा ती आकृती मात्र शांतपणे ही धावपळ बघत होती. तब्बल अर्धातास आहे त्याच जागी ती ढगात स्तब्धपणे तरंगत होती. ती अकृती जरी मानवी दिसत होती तरी तीला माणसासारखे पाय नव्हते तर त्या जागी दोन शेपट्यांसारखा भाग होता जो हवेत तरंगत होता. अर्ध्यातासानंतर अचानक वारा वाहू लागला, त्यानंतर ती आकृती हळूहळू ढगात लुप्त झाली. असे प्रत्यक्षदर्शिंनी सांगितले आहे.

दरम्यान, झांबिया सरकारने या घटनेची गंभीर दखल घेतली असून या आकृतीचा परग्रहाशी काही संबंध तर नाही ना अशी शक्यता व्यक्त केली आहे. आकृतीच्या व्हिडिओवरुन आता पुढचा तपास सुरु आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या