Video – काबुलमध्ये बुरखा घालून महिलांनी काढला मोर्चा, तालिबान्यांचे केले समर्थन

तालिबान्यांनी अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यानंतर स्वतःचे सरकार स्थापन केले आहे. यावरून संपूर्ण जगभरातून टीका होत आहे. काही दिवसांपूर्वी महिलांनी धैर्य दाखवत तालिबान्यांच्या विरोधात निदर्शने केली होती. आता काही महिलांनीच तालिबान्यांच्या समर्थनार्थ बुरखा घालून मोर्चा काढला आहे.


तालिबानी सरकार हे न्याय सरकार असल्याची प्रतिक्रिया काही महिलांनी दिली. आधीचे सरकार शोषण करणारे सरकार होते, फक्त सुंदर महिलांना नोकरी दिली जायची असे एका महिलेने सांगितले. तसेच तालिबान सरकार आल्यानंतर सकारात्मक बदल झाला आहे. महिलांनी हिजाब घातलाच पाहिजे असेही उपस्थित महिलांनी सांगितले. अफगाणिस्तानमधून पळून गेलेल्या महिला आमच्या देशाचे प्रतिनिधित्व करत नाहीत, तालिबानी सरकारकडून आम्ही समाधानी असल्याचेही काही महिलांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या