शेकडो गहाळ मोबाईल पोलिसांनी शोधून काढले

दोन वर्षांपूर्वी पश्चिम उपनगरातून गहाळ झालेले शेकडो मोबाईल विविध राज्यांतून परत मिळविण्याची कामगिरी मुंबई पोलिसांनी केली आहे. राज्याचे पर्यावरण व मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी पोलिसांच्या या कामगिरीचे काwतुक केले. तसेच त्यांच्या हस्ते काही नागरिकांना त्यांचे मोबाईल आज सुपूर्द करण्यात आले.

वांद्रे-पुर्ला संपुल पोलीस ठाण्यातील अद्ययावत केलेल्या नूतन सभागृहाचे उद्घाटन पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते आज करण्यात आले. याचवेळी एक दोन वर्षांपूर्वी ज्या नागरिकांचे मोबाईल गहाळ झाले होते. त्यातील काहींना त्यांचे मोबाईल आदित्य ठाकरे यांच्या हस्ते परत देण्यात आले. पोलीस आयुक्तालयातील परिमंडळ-10 मधील एमआयडीसी (65), अंधेरी (23), पवई (16) आणि मेघवाडी (13) या पोलीस ठाण्यातून मोबाईल गहाळ झाले होते. उपायुक्त महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रत्येक पोलीस ठाण्यातील पथकाने उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, दिल्ली तसेच महाराष्ट्रातील विविध ठिकाणांहून मुंबईतून गहाळ झालेले 117 मोबाईल शोधून काढले. यावेळी पोलीस आयुक्त परमबिर सिंग, सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील, पश्चिम प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या