ऑलिम्पिक गोल्ड मेडलिस्टचे अनेक तरुणींशी संबंध, VIDEO व्हायरल

1498

ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकलेले हंगेरीचे माजी जिमनॅस्ट व महापौर जोल्ट बोर्काई (54 ) सेक्स स्कँडलमध्ये अडकले आहेत. अनेक तरुणींबरोबर प्रणय चाळे करतानाचा त्याचा व्हिडीओ सोशल मीडीयावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पोर्न वेबसाईटवर अपलोड करण्यात आला आहे. जोल्ट ग्योर (Gyor) शहराचे मेयर आहेत.

video-3
या व्हिडीओमध्ये जोल्ट तरुणींच्या गराड्यात पहुडले असून ड्रग्ज घेत तरुणींबरोबर सेक्स करताना दिसत आहे. जोल्ट यांचा हा आपत्तीजनक अवस्थेतील व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर जोल्ट यांना सळो की पळो झाले. पण त्यांनी मात्र या व्हिडीओतील व्यक्ती आपण नसून आपल्यासारखीच दिसणारी दुसरी व्यक्ती असल्याचा दावा केला होता. पण नंतर मात्र त्यांनी व्हिडीओतील व्यक्ती आपणच असल्याची कबुली दिली. पण त्याचबरोबर मेयर पदाचा राजीनामा देण्यास त्यांनी नकार दिला आहे. आपली प्रतिमा मलिन करण्याचा हा डाव असल्याचा आरोप त्यांनी केला होता. हंगेरीमध्ये गेल्या रविवारी मेयर पदासाठी निवडणुका झाल्या होत्या.

याबद्दल बोलताना जोल्टने सांगितले की या व्हिडीओबरोबर छेडछाड करण्यात आली आहे. तसेच अनेक तरुणीशी मैत्रीपुर्ण संबंध असल्याचे जोल्ट यांनी कबुल केले आहे. त्यांचा हा व्हिडीओ क्रोएशियातील डबरोविंक अड्रीयाएटीक किनाऱ्यावरील आहे. तसेच यानंतर जोल्ट यांनी कुटुंबाबरोबरचा एक फोटो पोस्ट केला. त्याखाली आम्ही कायम एकत्र आहोत असे लिहले. जोस्ट यांनी 1988 साली सेऊल ऑलिम्पिकमध्ये सुर्वण पदक पटकवले होते.

आपली प्रतिक्रिया द्या