भुकेल्या हत्तीने हायवेवर ट्रक रोखला

36

सामना ऑनलाईन । कोलकाता

भूक असह्य झाल्यावर माणूस काय नि प्राणी काय? कोण काय करेल याचा नेम नाही. याचा प्रत्यय नुकताच पश्चिम बंगालमध्ये आला. पश्चिम बंगालमधून जाणारा हायवे क्रमांक ६० गढबेटा जंगलातून जातो. या जंगलात मोठय़ा प्रमाणावर हत्तींचे वास्तव्य आहे. या जंगलातून एक भुकेला हत्ती आपली भूक भागविण्यासाठी चक्क हायवेवर आला. या हत्तीने एक ट्रक रोखून धरला. या ट्रकमध्ये बटाटे भरले होते. या हत्तीने भरपेट बटाटे खाल्ले. हत्तीला पिटाळण्यासाठी फटाके फोडण्यात आले. मात्र हत्तीवर त्याचा काहीच परिणाम झाला नाही.

आपली प्रतिक्रिया द्या