
जम्मू-कश्मीर लिबरेशन फ्रंटचे (जेकेएलएफ) नेते यासीन मलिक यांना मृत्युदंड देण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रीय अन्वेषण प्राधिकरणाने (एनआयए) केली असून ही मागणी जम्मू-कश्मीरच्या जनतेच्या दृष्टीने अतिशय त्रासदायक आहे, अशी प्रतिक्रिया हुर्रीयत कॉन्फरन्सने दिली आहे. यासीन मलिक याला न्यायालयाने दहशतवाद्यांना वित्तपुरवठा केल्याच्या गुन्ह्यात जन्मठेप सुनावलेली आहे आणि दिल्लीच्या उच्च न्यायालयात त्याच्याविरोधात सुरू असलेल्या खटल्यात एनआयएने फाशीच्या शिक्षेची मागणी केलेली आहे.