ऐकावं ते नवलच…’या’ पती-पत्नीचे 105 मुलांना जन्म देण्याचे ध्येय, वाचा यामागचे कारण

वयाच्या 25व्या वर्षीच एका तरुणीने चक्क 22 मुलांना दिला आहे, मात्र तिचे आणि तिच्या नवऱ्याचे खरे स्वप्न काही वेगळेच आहे. हे वाचून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.

रशियातील क्रिस्टिना ओजटर्क (25) असे या तरुणीचे नाव आहे. तिचे लग्न तुर्की शहरातील 56 वर्षीय गॅलिप नावाच्या अब्जाधीशासोबत झाले. क्रिस्टिना अवघ्या 17व्या वर्षी पहिल्या मुलाची आई बनली, त्यानंतर तिने 22 मुलांना जन्म दिला. तिने आणि तिच्या नवऱ्याने मोठ्या कुटुंबाचे स्वप्न पाहिले. आता आ्म्ही दोघे मिळून हे स्वप्न पूर्ण करत आहोत, यामुळेच आपल्याला अजून 80 मुले व्हावीत. म्हणजे एकूण 105 मुलांचे आई-वडील होण्याची आमची इच्छा आहे, असे तिने एका मुलाखतीवेळी सांगितले.

याविषयी क्रिस्टिना सांगते की, तिने वयाच्या 17व्या वर्षी म्हणजे 2014 साली ‘विका’ नावाच्या मुलीला जन्म दिला. आतापर्यंत या जोडप्याला 22 मुले झाली आहेत. याकरिता क्रिस्टिना आणि तिचा नवरा गॅलिप यांनी सरोगसी उपचारपद्धतीचा वापर केला आहे. घरात लहान मुलांमुळे नेहमीच गोंधळ असतो, पण यामुळे माझे घर पाळणाघरासारखे झाले आहे तसेच मी नेहमीच इतर आईंप्रमाणे माझ्या मुलांसोबत राहते आणि त्यांच्यावर भरभरून प्रेम करते.

क्रिस्टिनाची सर्व लहान मुले रात्री 8 ते सकाळी 6 वाजेपर्यंत झोपतात. त्यावेळी घरात शांतता असते. नाहीतर इतर वेळी दिवसभर मुलांचे उड्या मारणे, रडणे, ओरडणे, गोंधळ घालणे सुरूच असते. मुलांच्या रोजच्या घडामोडींची नोंद ती एका डायरीत करते. इन्स्टाग्रामवर तिने मुलांसोबत मस्ती करतानाचे अनेक फोटो शेअर केले आहेत. लहानपणापासूनच तिने एका मोठ्या कुटुंबाचे स्वप्न पाहिले होते. नेमके तिच्या पतीचेही हेच स्वप्न होते. आता आम्ही दोघे मिळून आमचे स्वप्न पूर्ण करण्यात मग्न आहोत, असे तिने एका मुलाखतीवेळी सांगितले.

सरोगसीद्वारे एवढ्या मुलांना जन्म देण्याचे कारणही तिने सांगितले आहे. ती म्हणते, जेव्हा पहिल्यांदा ती तिचा नवरा गॅलिप याला जॉर्जिया येथे भेटली होती तेव्हाच त्या दोघांनी सरोगसीद्वारे बाळाला जन्म देण्याची योजना आखली. पूर्वी दरवर्षी ती एका बाळाला जन्म देत असे, मात्र शारीरिकदृष्टया कमकुवत झाल्यानंतर त्यांनी याकरिता सरोगसीचा आधार घेतला. ते दोघेही सरोगसी उपचाराकरिता एका बाळासाठी 10 हजार डॉलर्स म्हणजेच सुमारे 8 लाख रुपये खर्च करतात.