शेतात मृतावस्थेत आढळले दाम्पत्य, विजेच्या तारेला स्पर्श झाल्यामुळे मृत्यूची शक्यता

चंद्रपूर शहरालगत असलेल्या घुग्गुस येथील शेत शिवारात पती-पत्नीचा मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. स्वामीदास तक्काला (30) व उमेश्वरी टक्कला (28) असे मृतकाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हे दाम्पत्य रात्रीच्या सुमारास शेतात गेले होते. त्यावेळी जनावरांपासून पीक रक्षणासाठी लावलेल्या जिवंत विद्युत तारेला स्पर्श होऊन यांचा मृत्यु झाला असावी अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच घुग्घुस पोलीस स्टेशनचे ठाणेदार पथकासह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांकडून पंचनामा करण्यात आला असून पुढील तपास घुग्घुस पोलीस करीत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या