16 वर्षांपूर्वीच्या भांडणाचा सूड; पतीने केले पत्नीच्या तोंडावर चाकूचे वार!

1105
murder-knife

16 वर्षांपूर्वी झालेल्या एका भांडणाचा सूड पतीने पत्नीच्या चेहऱ्यावर वार करून उगवला आहे. अहमदपूर येथील ही घटना असून बालिकाबाई ढेरे असं या महिलेचं नाव आहे. बालिकाबाई या घटनेत जखमी झाल्या आहेत. या प्रकरणी त्यांचा पती बालाजी ढेरे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बालाजी आणि बालिकाबाई यांचा विवाह 1982 साली झाला होता. अनेक वर्षांच्या संसारानंतर 2004साली बालिका यांच्याशी भांडण करून तसेच त्यांना जबर मारहाण करून बालाजी घर सोडून निघून गेला. त्यानंतर 2018मध्ये पुन्हा परत आला आणि बालिका यांच्यासह राहू लागला. पण, दोन वर्षांनंतर म्हणजे 25 फेब्रुवारी 2020 रोजी पहाटे तीन वाजता जुन्या भांडणाचा सूड म्हणून झोपलेल्या बालिकाबाई यांच्यावर अचानक हल्ला केला. बालाजी याने शिवीगाळ आणि मारहाण करत लहान चाकूने बालिकाबाईंच्या चेहऱ्यावर, मानेवर आणि डोक्यावर सपासप वार केले.

सुदैवाने बालिकाबाईंचा आरडाओरडा त्यांचा मुलगा प्रशांत याने ऐकला आणि त्याने त्यांना वेळीच मध्ये पडत सोडवलं. मात्र बालाजी याने त्याच्यावरही काही वार केले. या प्रकरणी आरोपी बालाजी ढेरे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या