कोल्हापूर – वाढदिवसाच्या शुभेच्छा न दिल्याने पतीची पत्नीला हॉकी स्टिकने बेदम मारहाण

वाढदिवसाच्या शुभेच्छा न दिल्यच्या क्षुल्लक कारणातुन, पतीने पत्नीलाच हॉकी स्टिकने बेदम मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. मेघा अशोक जाधव (वय – 32, रा. शिवगंगा हॉस्टेल, ताराबाई पार्क) असे मारहाण झालेल्या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी पती प्रणव मिलिंद देशपांडे (वय – 28, रा. सरकारी घाट, सांगली, सध्या रा. कसबा बावडा, कोल्हापूर) यांच्यावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मेघा जाधव व प्रणव देशपांडे हे पती-पत्नी असून, वैवाहिक कारणातुन त्यांच्यात वाद आहेत. दि. 10 सप्टेंबर 2020 रोजी पत्नी मेघाने प्रणव याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या नाहीत. त्यामुळे प्रणवने हॉकी स्टिकने ओटीपोटावर मारून तिला जखमी केले. तसेच शिवीगाळ करून आई-वडील व पहिल्या पत्नीपासून झालेल्या मुलीस जीवे मारण्याची धमकी दिली.

या प्रकरणी पत्नी मेघा हिने शाहुपुरी पोलिसात फिर्याद दिली आहे. पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण कटकधोंड यांच्या मार्गदर्शनाखाली हेडकॉन्स्टेबल चव्हाण पुढील तपास करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या