पत्नीवर जीवघेणा हल्ला करणाऱ्या पतीचा संशयास्पद मृत्यू

सामना ऑनलाईन, पिंपरी

पत्नीच्या डोक्यात कोयत्याने वार करत जीवघेणा हल्ला करणाऱ्या पतीचा संशयास्पदरित्या मृत्यू झालाय. ही घटना हिंजवडी जवळच्या नेरे-जांबे इथे घडली आहे. दिलीप राठोड असं या पतीचं नाव आहे.

सुरक्षा रक्षकाची नोकरी करणाऱ्या दिलीप राठोड (वय-४५ वर्ष) याचा काही कारणावरून त्याची पत्नी ललिता राठोड वाद झाला. रागाच्या भरात त्याने ललिताच्या डोक्यात कोयत्याने वार केले, ललिताचा आरडाओरडा ऐकून शेजारपाजारची माणसं धावत राठोड यांच्या घराजवळ आली. त्यांनीच ललिताला रूग्णालयात दाखल केलं. मात्र त्यानंतर दिलीप राठोड यांचा मृत्यू झाला. तो मृत्यू कला झाला हे कळू शकलेलं नाहीये. पोलिसांकडे जेव्हा याघटनेबाबत चौकशी केली तेव्हा त्यांनीही आपल्याला अजून माहिती नसल्याचं सांगितलं.