नवरा गुप्तांगात घालायचा लिंबू, दारू; महिलेने सांगितली आपबीती

हरयाणामध्ये नवरा आपल्या बायकोचा शारीरिक छळ करायचा. तिच्या गुप्तांगात दारू आणि लिंबू घालायचा. महिलेने रडत रडत आपल्यावर झालेल्या अत्याचाराची कहाणी सांगत न्याय मागितला आहे.

हरयाणाच्या पानीपत जिल्ह्यात सविता (नाव बदलेले) चे 14 वर्षापूर्वी वरुण या तरुणाशी लग्न झाले होते. वरुणला दारू पिण्याचे व्यसन होते. वरुण सवितावर शारीरिक अत्याचार करायचा. तिच्य गुप्तांगात तो लिंबू आणि दारू टाकायचा. इतकेच नाही तर तिच्याशी अनैसर्गिक संभोग करायचा. त्यामुळे सविता आजारी पडली होती. सविताला तिच्या माहेरच्यांनी रुग्णालयात दाखल केले त्यानंतर ती बरी झाली. सविताला अत्याचार सहन न झाल्याने पोलिसांत धाव घेतली. पोलिसांनी वरुण विरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. माध्यमांशी बोलताना सविता रडत होती आणि आपल्याला न्याय मिळावा अशी मागणी करत होती.

आपली प्रतिक्रिया द्या