मोलकरणीसोबत होते नवऱ्याचे अनैतिक संबंध, पत्नीला कळले आणि…

नवरा मोलकरणीच्या प्रेमात पडला आहे. ही गोष्ट एक दिवस अचानक पत्नीच्या लक्षात येते. त्यानंतर ती मोलकरणीला बेदम मारहाण करते. हे प्रकरण एवढ्यावरच न थांबता न्यायालयात पोहोचल्यानंतर सुनावणीदरम्यान मोलकरणीने दिलेल्या माहितीमुळे खरा उलगडा होतो.

गोल्ड कोस्ट बुलेटिन रिपोर्टनुसार, ऑस्ट्रेलियातील जॅकलिन मेरी मॉरिस (45) या महिलेला तिच्या नवऱ्याचे घरातील मोलकरणीसोबतच प्रेम प्रकरण सुरू असल्याची माहिती मिळाली. मॉरीसला दोन मुले आहेत. तिने या गोष्टीची व्यवस्थित शहानिशा करून मगच याबाबत मोलकरीण आणि नवऱ्याशी बोलायचे, असे ठरवले. याकरिता एक आठवडाभर तिने नवरा आणि मोलकरीण यांचे निरीक्षण केले. त्यानंतर तिने सफाई कामगाराला बेदम मारझोड केली.

हे प्रकरण एवढ्यावरच थांबले नाही, तर जॅकलिन मॉरिसने याबाबत पतीविरोधात साउथपोर्ट मॅजिस्ट्रेट न्यायालयात पोहोचले. 5 डिसेंबर रोजी या प्रकरणावरील सुनावणीदरम्यान, मोलकरणीने सांगितले की, ती गोल्ड कोस्टमध्ये तिच्या कारमध्ये बसून कोणाची तरी वाट पाहात होती. त्याच वेळी मॉरीस तिथे पोहोचली. तिने मोलकरणीला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तिला प्रत्युत्तर देण्यासाठी मोलकरणीनेही तिला शिवीगाळ करत म्हटले, मला तुझ्या नवऱ्याची गरज नाही.

याबाबत मॉरिसने न्यायालयात दावा केला की, या मोलकरणीने नवऱ्याच्या विरोधात यापूर्वी मला भडकावले होते. मोलकरणीने मॉरिसला सांगितले की, तू तुझ्या पतीसोबत रोमान्स कसा करायचा ते शिकले पाहिजे. यानंतर मॉरिसने महिलेवर हल्ला केल्याचे सरकारी वकील डॉन रीड यांनी न्यायालयाने सांगितले. तिने कारच्या खिडकीतून महिलेच्या चेहऱ्यावर अनेक वार केले आणि नंतर तिचे केस ओढले. त्यामुळे महिलेच्या चेहऱ्यावर जखमेच्या अनेक खुणा होत्या. तिचे काही केसही उपटले होते.

न्यायालयाने या घटनेबाबत केलेल्या युक्तिवादात सांगितले की, मोलकरणीवर हल्ला केल्याच्या आठवडाभर आधीच मॉरिसला पती आणि मोलकरीण यांच्यामधील प्रेम प्रकरणाबाबत माहिती मिळाली होती. मोलकरीण गेल्या 4 वर्षांपासून या कुटुंबासाठी काम करत होत्या. मॉरीसच्या पतीने मोलकरणीला अनेक लैंगिक संदेश आणि न्यूड फोटोही पाठवले होते. ते सगळे मेसेजेस मोलकरणीने मॉरीसला फॉरवर्ड केले होते. मॉरिसने मोलकरणीला बेदम मारहाण केल्याचा आरोप मान्य असून ती सध्या तिच्या पतीसोबत राहात आहे.