पत्नी माहेरी जाणार म्हणून नाराज होता पती; तलवारीने वार करत स्तन आणि नाक कापले

पती-पत्नीचे नाते अतूट असते. सातजन्म सोबत राहण्याच्या आणाभाका दोघे घेतात. मात्र, एखादा संशय किंवा नाराजी व्यक्तीला सैतान करते. अशीच एक घटना मध्य प्रदेशातील आगर मालवा जिल्ह्यात घडली आहे. पत्नीवर नाराज असलेल्या पतीने रागाच्या भरात तलवारीने पत्नीवर अनेक वार केले. त्याने तिचे नाक,जीभ आणि स्तन कापले. त्यानंतरही तो तिच्या शरीरावर वार करतच होता. घटनेनंतर पती आणि त्याचे कुटुंबीय फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

आगर मालवा जिल्ह्यातील विद्यानगरमध्ये बिरलाग्राममध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. पत्नीने आपण माहेरी जाणार असे पतीला सांगितले होते. पत्नीने माहेरी जाण्याचे सांगितल्यानंतर तिचा पती नाराज होता. त्याची नाराजी दिवसेंदिवस वाढत होती. बुधवारी पत्नीने पुन्हा माहेरी जाण्याचा विषय काढल्यावर पतीच्या तळपायाची आग मस्तकात गेली. त्याने रागाच्या भरात तलवार काढली आणि पत्नीवर सपासप वार केले. रागाच्या भरात त्याने पत्नीचे स्तन,जीभ आणि नाक कापले. त्यानंतर तिच्या गुप्तांगावर तलवारीने वार केले. त्यानंतरही तो तिच्या शरीरावर वार करतच होता.

पत्नीला ठार मारण्याच्या उद्देशाने त्याने तिच्यावर वार केल्याचे स्पष्ट होत आहे. राधाबाई असे पतीच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी राधाबाईला तातडीने रुग्णालयात दाखल केले. तिला मोठ्या प्रमाणात मारहाण करून वार करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. या हल्ल्यात तिचे नाक आणि स्तन आणि जीभ कापण्यात आली असून तिच्या चेहऱ्याला आणि गुप्तांगाला गंभीर जखमा झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

पत्नीवर वार करत ती रक्ताच्या थारोळ्यात पडल्यावर पतीने आणि त्याच्या कटुंबीयांनी घटनास्थळाहून पोबारा केला. ते फरार असून त्यांचा शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेचा तपास सुरू असून राधाबाईच्या पतीवर गुन्हा दाखल करून त्याचा आणि त्याच्या कुटुंबीयांचा शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या