बीड जिल्हा हादरला; पतीने पत्नीला दिली फाशी, मुलाचा चाकू भोसकून खून

6142

बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यात मोगरा येथील रामनगर तांडा येथे हादरवणारी घटना घडली. येथील एका तरुणाने पत्नीला फाशी देऊन तिची हत्या केली. यानंतर स्वत:च्या लहान मुलाचा चाकू भोसकून निर्घृणपणे खून केला. पत्नी व मुलाची हत्या केल्यानंतर आरोपीने स्वतः देखील आत्महत्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यात मोगरा येथे रामनगर तांडा आहे. येथे राहणाऱ्या बंडू उत्तम जाधव या 30 वर्षीय तरुणाने बुधवारी दुपारी शेतात कापूस वेचणी सुरू असताना पत्नीस ओढणीने फाशी दिली. यानंतर अल्पवयीन मुलगा सचिनवर चाकूने सपासप वार करून त्याचा खून केला. त्यानंतर स्वतःच्या हातावर कुऱ्हाडीने वार करून आत्महत्येचा प्रयत्न केला. यात तो गंभीर जखमी झाला असून उपचारासाठी त्याला बीड जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमागील कारणांचा उलगडा झालेला नाही. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे.

आपली प्रतिक्रिया द्या