जालन्यात चारित्र्याच्या संशयावरून पतीकडून पत्नीला जबर मारहाण, पत्नीचा मृत्यू

प्रातिनिधिक फोटो

जालन्यात चारित्र्याच्या संशयावरून पतीने आपल्या पत्नीला जबर मारहाण केली. या मारहाणीत पत्नीचा मृत्यू झाला आहे.

अंबड तालुक्यातील बळेगाव येथील उर्मिला अंकुश झिंजुर्डे व अंकुश नारायण झिंजुर्डे हे पती-पत्नी राहत होते. उर्मिलाच्या चारित्र्यावर संशय घेऊन पती अंकुशने लोखंडी फुकणी डोक्यात जबर वार करुन गंभीरित्या जखमी केले. उर्मिलाला उपचारासाठी संभाजीनगर येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता उपचारापुर्वी तिचा मृत्यू झाला.

याप्रकरणी पती अंकुश झिंजुर्डे याच्यावर गोंदी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी पती अंकुशला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

आपली प्रतिक्रिया द्या