पत्नीने घेतली फाशी, नवऱ्याने बनवला व्हिडीओ

27

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली 

मथुरामध्ये पत्नी आत्महत्या करत असताना पतीने तिला वाचवायचे सोडून तिचा चक्क व्हिडीओ बनवला. ही घटना मथुरामधील बुद्धविहार कॉलनीत गुरुवारी रात्री घडली. राजकपूर असं त्या आरोपी पतीचं नाव असून सासू विमला हिलादेखील अटक करण्यात आली आहे.

मथुरामधील बुद्धविहार कॉलनीतील ही घटना आहे. २२ एप्रिल २०१५ मध्ये गीता आणि राजकपूर यांच लग्न झाल होत. लग्नाच्या काही दिवसांनंतरच राजकपूर आणि त्याच्या आईने कार घेण्यासाठी गीताचा जाच सुरू केला. माहेरहून हुंडा कमी आणल्यामुळे राजकपूर आणि त्याच्या आईने गीताचा शारीरिक आणि मानसिक छळ करायला सुरुवात केली. अखेर गुरुवारी गीताने या सर्व जाचाला कंटाळून फाशी घेतली त्यावेळी राजकपुरने तिला वाचवण्याचा प्रयत्न न करता तिचा व्हिडीओ बनवला. तर दुसरीकडे गीताची सासू आणि नंणद यांनी तिला अडवण्याचा भरपूर प्रयत्न केला असता त्यांना न जुमानता गीताने आत्महत्या केली.पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तक्रार दाखल करून नवरा आणि सासूला अटक केली. पोलिसांनी सांगितलं की गुरुवारी गीताच्या आत्महत्येनंतर तिच्या आत्महत्येचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.

 summary : husband records wife suicide by hanging in mathura

आपली प्रतिक्रिया द्या