हृतिक रोशनची चाहती म्हणून पतीने केली पत्नीची हत्या

1436

हृतिक रोशनचे जगभरात लाखों चाहते आहेत. परंतु त्याच्या एका महिला चाहतीला याच कारणास्तव जीव गमावावा लागला आहे. अमेरिकेमध्ये ही घटना घडली असून अभिनेता म्हणून हृतिक रोशन आवडत असल्याने पतीने आपल्या पत्नीचा खून केला आहे, असे कारण मृत महिलेच्या निकटवर्तीयांकडून सांगितले जात आहे. तसेच पत्नीची हत्याकरून त्याने देखील आत्महत्या केली आहे.

अमेरिकेत राहणाऱ्या दिनेश्वर बुद्धीदात (वय 33 वर्ष) आणि त्याची पत्नी डोन्ने डोजॉय (वय 27 वर्ष) यांचा संसार सुरू होता. डोजॉय बार टेंडर म्हणून काम करत होती. तिला हृतिक रोशन भलताच आवडायचा. मात्र तिची हीच आवड त्या दोघांमधील वादाचे कारण व्हायची अशी माहिती तिच्या निकटवर्तीयांनी पोलिसांना दिली आहे. हृतिकवरील तिच्या प्रेमामुळेच चिडलेल्या बुद्धीदातने तिची हत्या केली असल्याचा संशय माला रामधनी या डोजॉयच्या निकटवर्तीय व्यक्तीने सांगितले.

पोलीस अहवालानुसार, डोजॉय ही कामासाठी बाहेर पडणार होती. पण पतीला वेळ द्यावा, त्याच्यासोबत चित्रपट पहावा म्हणून ती घरी थांबली. मात्र त्याच संध्याकाळी बुद्धीदातने तिच्या बहिणीला मेसेज टाकला की त्याने डोजॉयची हत्या केली आहे आणि घराची चावी फ्लॉवरपॉट खाली ठेवली आहे.

इतकंच नाही तर आरोपी पतीने तिचा मृतदेह अपार्टमेंटमध्येच सोडला आणि स्वत: जवळच्या एका पार्कमध्ये जाऊन आत्महत्या केली. डोजॉयचा मित्र रोडने दिलेल्या माहितीनुसार ‘जुलैमध्ये या दोघांचं लग्न झालं होतं. तो तिच्या सौंदर्यावर भाळला होता, ती अधिक पैसे कमवायची म्हणून तिच्यावर जळायचा’.

आपली प्रतिक्रिया द्या