पुणे – पत्नी व मुलांचे 100 तुकडे करून फ्रीजमध्ये ठेवायची धमकी, पतीसह 6 जणांवर गुन्हा दाखल

1063

माहेरून पैसे न आणल्यामुळे पत्नी व मुलांचे 100 तुकडे करुन फ्रीजमध्ये ठेवायची धमकी पतीने दिली. याप्रकरणी सहा जणांवर हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पती सिध्दार्थन व्ही.पी (वय – 42, रा.तंजावरु, तामिळनाडू), पनीर माथोर, वडीवग्गाल व्ही.पी. (वय – 63) आणि इतर तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी फुरसुंगी येथे राहाणाऱ्या 34 वर्षीय महिलेने तक्रार दाखल केली आहे.

फिर्यादी महिलेचा सिध्दार्थन बरोबर 200 मध्ये विवाह झाला होता. यानंतर माहेरून पैसे घेऊन आणण्यासाठी तिचा वारंवार छळ करण्यात येत होता. पतीबरोबर इतर सासरचेही मानसिक व शारीरीक तिचा छळ करत होते. पतीने तिला व मुलांना जीवे ठार मारुन तुमचे 100 तुकडे करुन फ्रीजमध्ये ठेवीन अशी धमकी दिली. यानंतर फिर्यादीचा पती तिला व मुलांना सोडून निघून गेला. मुलांची कोणतीच जबाबदारी त्याने घेतली नाही. घटस्फोट देण्यासाठी तो सातत्याने दबाव टाकत होता. दरम्यान, या प्रकरणाचा तपास महिला पोलिस हवालदार बर्वे करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या