पैसे मागितल्याने चिडलेल्या नवऱ्याने ओतलं बायकोच्या चेहऱ्यावर गरम तेल

22

सामना ऑनलाईन । भिवंडी

कपडे शिवण्यासाठी मागितलेल्या साडेतीनशे रुपयांच्या क्षुल्लक कारणावरून नवऱ्याने बायकोच्या चेहऱ्यावर उकळतं तेल ओतल्याची घटना नागपूर येथे घडली आहे. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या जमुना गायकवाड (३१) त्वरित स्थानिक रुग्णालयात हलवण्यात आलं असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.

नागपूर येथील भिवंडी येथे राहणाऱ्या विठ्ठल गायकवाड याच्या घरी त्याचा एक मित्र आला होता. व्यवसायाने रिक्षाचालक असलेल्या विठ्ठलकडे त्याच्या बायकोने कपडे शिवण्यासाठी पैसे मागितले. मित्रासमोर पैसे मागितल्यामुळे चिडलेल्या विठ्ठलने तिच्या चेहऱ्यावर उकळतं तेल ओतलं. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी विठ्ठलच्या विरोधात तक्रार दाखल केली असून पुढील तपास सुरू आहे.

आपली प्रतिक्रिया द्या