बायको जीन्स घालते म्हणून पतीने केला खुनाचा प्रयत्न

1947

नवरा बायकोमध्ये भांडणं होत असतात. परंतु डोंबिवलीमध्ये क्षुल्लक कारणावरून पतीने पत्नीला ठार करण्याचा प्रयत्न केला आहे. पत्नी जीन्स घालते म्हणून पतीने हे टोकाचे पाऊल उचलले. सुदैवाने पत्नी बचावली असून पोलिसांनी पतीला अटक केली आहे.

डोंबिवलीत सुधीर जाधव आणि सुजाता जाधव हे दाम्पत्य राहत होते. पती पत्नी दोघे कामाला जात. पत्नी सुजाता जीन्स टीशर्ट घालते याचा राग सुधीर जाधव यांना होता. यावरून दोघांमध्ये अनेकवेळा भांडणही झाले होते. मंगळवारी पुन्हा दोघांमध्ये याच कारणावरून जोरात वाद झाला. सुधीर यांनी रागाच्या भरात सुजाताचा गळा आवळला. त्यात सुजाता बेशुद्ध झाल्या. नंतर सुधीर यांनी घरातून पळ काढला. तेव्हा शेजारच्यांनी धाव घेत सुजाता यांना रुग्णालयात दाखल केले. तिच्यावर उपचार सुरू असून पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या