तरुणीला फसवत केले लग्न; तिच्या अश्लील व्हिडीओची केली अॅपवर विक्री

मध्य प्रदेशातील विदिशामध्ये एका तरुणाने फसवणूक करत तरुणीशी लग्न केले. लग्नानंतर तिचे अश्लील व्हिडीओ अॅपवर टाकून त्यातून पैसे कमविल्याची धक्कादायक घटना विदिशामध्ये घडली आहे. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर तरुणीने तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीसह दोघांना अटक केली असून त्यांची चौकशी करण्यात येत आहे.

आरोपीने आपण माधव महाराज असल्याचे सांगत तरुणीला जाळ्यात ओढत तिच्याशी लग्न केले होते. त्यानंतर तिचे लैंगिक शोषण करत तिचे अश्लील व्हिडीओ अॅपवर अपलोड करत त्यातून कमाई केली आहे. आरोपी विवाहित असून आपली फसणूक झाल्याचे लक्षात आल्यावर तरुणीने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या तपासात ही धक्कादायक घटना उघडकीस आली.

ऑनलाईन अॅपवर त्याने टाकलेल्या अश्लील व्हिडीओच्या आधारे चंद्रजीत अहिरवार आणि माधव यांना अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपी विवाहित असूनही त्याने एका तरुणीला आपल्या जाळ्यात ओढले. आपण आध्यात्मिक गुरु असून माधव महाराज असल्याचे त्याने तरुणीला भासवले. फेसबुकवर त्यांची ओळख झाली होती.

तरुणीला प्रलोभने दाखवत तिची फसवणूक करत त्यांनी तिला विदिशामध्ये आणले. तिच्याशी लग्न करून तिचे लोंगिक शोषण करण्यास त्याने सुरुवात केली. त्यानंतर तिचे अश्लील व्हिडीओ त्याने सेक्स अॅपवर अपलोड केले. विविध अॅपवर असे व्हिडीओ अपलोड करत त्याने मोठी रक्कम जमवल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याने तीन वेगवेगळ्या बॅंक खात्यांमध्ये सहा लाखांपेक्षा जास्त रक्कम या व्हिडीओतून जमविली होती.

या अॅपवर मागणीप्रमाणे तो व्हिडीओ अपलोड करत होता. त्याचप्रमाणे व्हिडीओसाठी त्याला परदेशातूनही पैसे मिळाल्याची माहिती मिळाली आहे. तसेच तरुणीची फसवणूक करत तिचे 15 लाखांचे दागिने आणि 45 हजार रुपये त्याने हडपल्याचेही तपासात स्पष्ट झाले आहे. याबाबत अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या