पत्नी म्हणते, आधी करिअर मग मुलं; पतीची न्यायालयात धाव…

आजच्या जगात महिला फक्त चूल आणि मूल यात अडकलेल्या नसून त्या पुरुषांच्या बरोबरीने पाऊल टाकत पुढे वाढत आहेत. मात्र भोपाळमध्ये पत्नीने आधी करिअर मगच मुलांचा विचार करू, असे सांगितले असता पतीने कौटुंबिक न्यायालयाचे दार ठोठावले आहे. कौटुंबिक न्यायालयात अशी तीन प्रकरणे समोर आली आहेत. ज्यात महिला लग्नानंतर आधी शिक्षण आणि करिअरमुळे संसारात पुढे वाढायला तयार नाही. अशात महिलांचे पती आणि कुटुंबीय त्यांच्यावर दबाव टाकत आहेत. यामुळे अशी प्रकरण आता न्यायालयात येऊ लागली आहेत. यावर बोलताना कौटुंबिक न्यायालयाचे कॉऊन्सेलर म्हटले की, ‘आजकाल महिला करिअरला प्राधान्य देत आहेत.’

कौटुंबिक न्यायालयात 15 टक्के अशी प्रकरणे येत आहेत

न्यायालयातील कॉऊन्सेलरचे असे मानाने आहे की, आजकाल अशा प्रकारची 10 ते 15 टक्के प्रकरणे येत आहेत, ज्यामध्ये करिअरविषयीच्या आग्रहामुळे जोडप्यामध्ये वाद निर्माण होत आहेत. आता महिलाही आपल्या करिअरविषयी जागरूक होत आहेत. त्यांना असं वाटत की, आधी आपलं करिअर घडवावं, नंतर मुलांचा विचार करावा.

याच तीन प्रकारांमधील एका प्रकरणात कुटुंब पुढे वाढवण्यावरून इंजिनीअरिंग जोडप्यामध्ये भांडण झालं. इंजिनीअर पतीने नुकतेच आपले एक स्टार्टअप सुरु केले आहे. तर पत्नी नोकरी सांभाळून यूपीएससी परीक्षेची तयारी करत आहे. लग्नाला चार वर्ष झाली, मात्र पत्नीने करिअरमुळे कुटूंब पुढे वाढवण्यास नकार देत आहे. यालाच कंटाळून पतीने कौटुंबिक न्यायालयाचे दार ठोठावले असता या दोघांची काउन्सिलींग करून समजूत काढण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या