बायको आणि वडिलांच्या अनैतिक संबंधांचा सुगावा लागला, वडिलांचे श्राद्ध घालत केली हत्या

4347
murder

गुंतागुंतीची नाती, त्यातून घडलेल्या एका गंभीर गुन्हाचा उलगडा राजस्थानातील अलवर पोलिसांनी केला आहे. एका व्यक्तीने त्याच्या बायकोला आणि वडिलांना अनैतिक संबंध ठेवत असताना पाहिले होते. यानंतर प्रचंड संतापलेल्या या व्यक्तीने वडिलांचे जिवंतपणी श्राद्ध घातले, मुंडण केले आणि नंतर त्यांची हत्या केली. पोलिसांनी या प्रकरणी प्रदीप यादव (वय-32) या आरोपीला अटक केली आहे.

लातूरमध्ये ठिकठिकाणी झळकतायत ‘भाड्याने देणे आहे’चे फलक, कारण माहिती आहे का ?

अलवर जिल्ह्यातील मुंडावर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये तीनरुरकी गाव येतं. इथे गच्चीवर झोपलेल्या रामसिंह यादव ( 60वर्षे) नावाच्या माणसाची हत्या झाल्याचे पोलिसांना कळाले. पोलिसांनी तपास सुरू केल्यानंतर त्यांच्या संशयाची सुई मुलावर येऊन थांबली होती. प्रदीपला ताब्यात घेतल्यानंतर त्याने गुन्हा कबूल केला. वीजेच्या खांबावर लावण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या अवजड वस्तूने वडिलांच्या डोक्यात वार कर त्यांची हत्या केल्याचं प्रदीपने सांगितलं.

मुंबईत येण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आईने नवजात बालकाला विकले

रामसिंह याचे त्याच्या सूनेसोबत म्हणजेत प्रदीपच्या बायकोसोबत अनैतिक संबंध होते. याची कुणकुण प्रदीपला लागल्यानंतर त्याने वडिलांना धडा शिकवायचं ठरवलं होतं. मंगळवारी संध्याकाळी प्रदीपने वडिलांना ठार मारण्याचं ठरवलं होत. तो त्याचवेळी घरातून बाहेर पडला होता. त्याने बुधवारी सकाळी मुंडण केलं, वडिलांचं श्राद्ध घातलं आणि रात्री वडिलांची हत्या करत सुनेसोबत अनैतिक संबंध ठेवल्याची शिक्षा दिली. ही हत्या केल्याचे प्रदीपला कोणतंही दु:ख वाटत नसल्याचं पोलिसांनी सांगितलं. पोलिसांनी तपासाला सुरुवात केल्यानंतर प्रदीपच्या घरातील या सगळ्या प्रकाराबाबत गावकऱ्यांनी माहिती दिली. हत्या करून प्रदीप पळून गेल्यानंतर सगळा संशय त्याच्यावरच होता. पोलिसांनी त्याच्या मोबाईल लोकेशनच्या आधारे शेजारच्या गावातून पळून जाण्याच्या तयारीत असताना अटक केली.

आपली प्रतिक्रिया द्या