अर्धा इंच चांदीच्या पतंगाने वेधले पतंगप्रेमींचे लक्ष

31

सामना ऑनलाईन । हैद्राबाद

अवघ्या एका दिवसावर आलेल्या मकर संक्रातीमुळे पतंगप्रेमी आनंदले आहेत. बाजारामध्ये रंगीबीरंगी पतंग आणि मांजा विक्रीची दुकाने सर्वत्र थाटली गेली आहेत. लहान थोरांपासून अगदी ज्येष्ठ नागरिकही पतंग उडवण्याचा आनंद घेताना दिसत असून आकाश पतंगांच्या विविध रंगांची गर्दी वाढत आहे. देशामध्ये पतंगांची क्रेझ लक्षात घेता हैद्राबाद येथील एका विक्रेत्याने एक अनोखा पतंग बनवला आहे.

एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, हैद्राबाद येथील एका दुकानदाराने अवघ्या अर्ध्या इंचाचा पतंग आणि त्याची रिळ बनवली आहे. विशेष म्हणजे त्याने ही कला चांदीचा धातू वापरून साकारली आहे. आनंद रेड्डी असे या पतंग विक्रेत्याचे नाव आहे. पतंग आणि सोबत त्याची मांजा असलेली रिळ बनवण्यासाठी १ ते २ ग्राम चांदी लागली. यात पतंगासाठी फक्त ०.५ ग्राम चांदी वापरण्यात आली आहे. हा इवलासा पतंग पाहण्यासाठी पतंगप्रेमींची झुंबड उडताना दिसत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या