का करावे लागले पोलिसांना बलात्काऱ्यांचे एन्काऊंटर? वाचा महत्वाची बातमी

40154

तेलंगाणा पोलिसांनी डॉक्टर तरुणीवर बलात्कार केल्याप्रकरणी आणि तिचा खून करून जाळून टाकल्याप्रकरणी 4 जणांना अटक केली होती. अटक केल्याच्या अवघ्या 7 दिवसांत या आरोपींना Encounter मध्ये ठार मारण्यात आलं. देशातील असंख्य नागरिकांनी खासकरून महिलांनी या एन्काऊंटरनंतर तेलंगाणा पोलिसांचे कौतुक केले आहे आणि आभारही मानले आहेत. मात्र काहींनी या चकमकीवर शंका उपस्थित करत कायद्याच्या चौकटीत राहूनच आरोपींना शिक्षा द्यायला हवी होती असे मत व्यक्त केलं आहे. नेमकं असं काय झालं की पोलिसांना आरोपींचे एन्काऊंटर करावे लागले असा प्रश्न विचारला जाऊ लागला होता.

मोहम्मद आरीफ, नवीन, शिवा आणि चन्नकेशवुलू या चार आरोपींनी शमशाबाद परिसरात पीडितेला गाठलं होतं. या चौघांनी तिला जबरदस्ती दारू पाजण्याचा प्रयत्न केला. यानंतर चौघांनी तिच्यावर बलात्कार केला. तरुणी आरडाओरडा करण्याचा प्रयत्न करत असल्याने आरोपींनी तिचा गळा आवळून खून केला आणि नंतर तिच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळून टाकलं. 29 नोव्हेंबरला पोलिसांनी या आरोपींना अटक केली होती. या घटनेचे नाट्यरुपांतरण करण्यासाठी पोलिसांनी शुक्रवारी पहाटे आरोपींना घटनास्थळी नेलं होतं.

शमसाबादचे पोलीस उपायुक्त प्रकाश रेड्डी यांनी दिलेल्या माहितीनुसार चारही आरोपींनी घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. त्यांनी पोलिसांकडची बंदूक हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला आणि पोलिसांवरच गोळ्या झाडल्या. या गोळीबारात 2 पोलीस जखमी झाल्याचेही वृत्त आहे. नाईलाजास्तव पोलिसांना या आरोपींवर गोळीबार करावा लागला ज्यात चारही जणांचा मृत्यू झाला.

आपली प्रतिक्रिया द्या