हैदराबाद एन्काऊंटर – आरोपींच्या कुटुंबीयांनी मागितली 50 लाखांची नुकसान भरपाई

1669

हैदराबाद येथे वेटरनरी डॉक्टरवर बलात्कार करून तिला जिवंत जाळणाऱ्या चारही नराधमांचा तेलंगणा पोलिसांनी एन्काऊंटरमध्ये खात्मा केला होता. या चारही नराधमांच्या खात्म्यानंतर संपूर्ण देशात जल्लोष करण्यात आला होता. मात्र त्या नराधमांचा एन्काऊंटर करणाऱ्या पोलिसांवर मात्र चौकशीची तलवार टांगली आहे.

वेटरनरी डॉक्टरवर झालेल्या सामूहिक बलात्काराची घटना समोर आल्यानंतर संपूर्ण देश पेटून उठला होता. मात्र त्या नराधमांनी केलेल्या महाभयंकर कृत्याचा त्यांच्या कुटुंबीयांना पश्चाताप होण्याऐवजी त्यांनी सर्वोच्च न्यायालयात नुकसान भरपाई मागण्यासाठी याचिका दाखल केली आहे. ‘द हिंदू’ने दिलेल्या वृत्तानुसार, आरोपींच्या कुटुंबीयांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करत एन्काऊंटरची सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे. त्यासोबतच त्यांनी प्रत्येक आरोपीच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 50 लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी देखील त्यांनी त्या याचिकेतून केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या